मान्सून एक्स्प्रेस 'या' तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल; हवामान खात्याचा अंदाज

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होईल, तर १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.

मुंबई: मान्सूनने Moosoon आता आपला वरचा सुरू केला आहे. बंगालच्या उपसागराचा Bay of Bengal दक्षिण भाग, निकोबार बेट, अंदमानच्या समुद्राचा दक्षिण भाग आणि अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागात मान्सून २१ मे रोजी दाखल झाला. हवामान साथ देत राहिले तर, मान्सूनचा पुढील प्रवास असाच वेगवान सुरू राहणार आहे. आणि मान्सून १ जून रोजी केरळात Kerala दाखल होईल, तर १० जून रोजी महाराष्ट्रात Maharashtra दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने Indian Meteorological Department वर्तविला. Meteorological Department forecasts monsoon to arrive in Maharashtra on June 10

अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ Tauktae Cyclone आता पूर्णत: शांत झाले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही पूर्णपणे कमी  झालेला नाही. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान या वादळामुळे नोंदविण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या किंचित सरी कोसळताना दिसत आहेत.

हे देखील पहा -

परंतु काल शुक्रवारी ढगाळ हवामान आणि किंचित सरींचे प्रमाण थोडे कमी झाले होते. आणि आता मुंबईत  Mumbai बऱ्यापैकी स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला दिसून आला आहे. आता पुन्हा एकदा हवामानात झालेल्या बदलामुळे उकाड्यात वाढ झाली असून, यामुळे मुंबईकर मात्र दिवसासह रात्रीही घामाघूम हाेत आहेत.

"लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन" बघा आता मोदी टीव्ही समोर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी

दरम्यान, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात, अंदमानचा संपूर्ण समुद्र, दक्षिण पूर्व भागात, अंदमान आणि निकोबार बेट त्यासोबतच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होणार आहे.  भारतीय हवामान शास्त्र विभागाने अशी शक्यता वर्तविली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live