चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा

 Cyclone
Cyclone

मुंबई : आग्नेय अरबी समुद्रामध्ये Arabian Sea कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ Keral तसेच लक्षद्वीप Lakshadweep किनाऱ्यावर चक्रीवादळ Cyclone  निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department दिला आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण Konkan व गोव्याच्या Goa किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.

15 व 16 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे असे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिले आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग Sindhudurg आणि रत्नागिरीत Ratnagiri अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  

13 मे च्या सकाळीच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. 15 मे रोजी लक्षद्वीप आणि परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीव्रता वाढत 16 मे रोजी चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होणार आहे. 

मुंबईत Mumbai 16 मे रोजी हे चक्रीवादळ सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा धोका नसला तरीही मुंबई महानगरपालिका कोणताही धोका उद्भवू नये या दृष्टिकोनातून दक्षता घेत आहे.

Edited By : Krushna Sathe 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com