मुंबईत परप्रांतीय मजुरांनी घेतला लॉकडाऊनाचा धसका !

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

मुंबईतल्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्या सुटणाऱ्या स्थानकावर होणारी प्रवाश्यांची ही गर्दी बघीतली तर सगळे प्रवासी (Migrants) परराज्यातले आहेत असे दिसून येते. विशेषतः उत्तर भारतात (North India) आपआपल्या गावी जाणारे आहेत. कारण २०२० मध्ये कोरोनाचा मुंबईत (Mumbai) शिरकाव झाल्या नंतर  सर्वत्र टाळेबंदी (Lockdown) करण्यात आली, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने, वाहनाने परप्रांतीय मजूर गावी जायला निघाले होते

मुंबई: मुंबईत कोरोना (corona) रुग्णांची संख्या लक्षणीय वाढतेय. वाढत्या रुग्णसंख्येमुळे परप्रांतीय धास्तावल्याचं चित्र आहे. त्यामुळे परराज्यात (State) जाणाऱ्या रेल्वे (Railway) प्रवाश्यांमध्ये वाढ झालीय.  Out of State Laborers going back to their home States in fear of Lock Down 

मुंबईतल्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्या सुटणाऱ्या स्थानकावर होणारी प्रवाश्यांची ही गर्दी बघीतली तर सगळे प्रवासी (Migrants) परराज्यातले आहेत असे दिसून येते. विशेषतः उत्तर भारतात (North India) आपआपल्या गावी जाणारे आहेत. कारण २०२० मध्ये कोरोनाचा मुंबईत (Mumbai) शिरकाव झाल्या नंतर  सर्वत्र टाळेबंदी (Lockdown) करण्यात आली, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने, वाहनाने परप्रांतीय मजूर गावी जायला निघाले होते, काही तर पर्याय नसल्याने चालत निघाले होते. आणि आता पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याच्या भीतीपोटी आधीच हे सगळे परप्रांतीय आपल्या गावी जायला निघाले आहेत.

दररोज मुंबई (Mumbai) रेल्वे स्थानकावरून (Railway station) ६० टक्केच्या क्षमतेने रेल्वे गाड्या धावत आहेत. मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये दररोज ५० रेल्वे गाडया बाहेर राज्यात जातात. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज २० गाड्या इतर राज्यात जातात. सरासरी दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ हजार असून यांपैकी फक्त मुंबईतून जाणाऱ्यांची संख्या १५  हजाराचा घरात पोहचली आहे. Out of State Laborers going back to their home States in fear of Lock Down 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात परप्रांतीय मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षाप्रमाणे स्थिती ओढवू नये म्हणून आधीच गावी पोहचण्यासाठी ही परप्रांतीय मजुरांची धडपड चालली आहे. 

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live