परप्रांतीय मजुर निघाले परत... (पहा व्हिडिओ)

Workers going Back to their native places due to lock Down
Workers going Back to their native places due to lock Down

पुणे :  राज्यभरात पुढच्या 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत Corona नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. निर्बंध आणखी कडक करण्यात आल्यामुळे लोक आजपासूनच आपआपल्या गावाला निघाले आहेत. पु

ण्याच्या रेल्वे स्थानकावर Pune railway station मजुरांची जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. अलिकडे हेच रेल्वे स्थानक बऱ्यापैकी रिकामं होतं, पण आज सकाळपासूनच गावाला जाणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. राज्यभरातील इतर शहरांमध्येही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. Due to lockdown the laborers moving from Pune to their village

लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी नवे निर्बंध जाहीर केले. त्यानुसार आज (बुधवारी) रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरीही याद्वारे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचं आहे. त्यांना आज रात्री 8 वाजेपर्यंतच प्रवास करता येईल.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परप्रांतीय मजूर हा मोठ्या प्रमाणात पुणे, चाकण, या परिसरात आहेत. हा परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे निघण्याच्या तयारीत आहे. कधीही लॉकडाउन Lockdown लागू शकतो. यामुळे २ दिवसापासून रेल्वे स्थानकावर मजूर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

काही विशेष ट्रेन हे पुण्यातून सोडण्यात आल्या असून, त्यासाठी परप्रांतीय मजूर हा मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे. कारण गेल्या लॉकडाउन मध्ये अक्षरशः मजुरांना आपल्या गावी पायी चालत जावे लागले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी निर्माण झाली आहे. Due to lockdown the laborers moving from Pune to their village

पोलीस Police प्रशासनाकडून व रेल्वे प्रशासनाकडून योग्य तो नियोजन करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टनचा social distances पूर्णतः फज्जा उडाला आहे. दाटीवाटीच्या संख्येने लोक त्या ठिकाणी गर्दी केले आहेत. यावर नियंत्रण आण्यासाठी या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. व काही फौज फाटाही तैनात करण्यात येणार आहे. कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रांगा नाहीत, सॅनिटायझर चा वापर नाही, व कोणत्याही प्रकारची टेस्टची सुविधा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना पसरण्याची भीती आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com