मनरेगाच्या कामामध्ये कोट्यावधींचा घोटाळा, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

साम टीव्ही
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

मनरेगाच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. मनरेगा अंतर्गत होणाऱ्या बोगस कामांसाठी आणि बोगस मजूर दाखवण्यासाठी रमेश चव्हाण आणि मनोज चव्हाण यांनी चिदगिरी गावातील अनेकांकडून कागदपत्रांची जमवाजमव केली.

नांदेड जिल्ह्यातल्या चिदगिरीत मनरेगाच्या कामावर बोगस मजूर आणि बोगस कामं दाखवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं उघडकीस झालंय. वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या ठेकेदारांनी हा प्रताप केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यात मनरेगाच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. मनरेगा अंतर्गत होणाऱ्या बोगस कामांसाठी आणि बोगस मजूर दाखवण्यासाठी रमेश चव्हाण आणि मनोज चव्हाण यांनी चिदगिरी गावातील अनेकांकडून कागदपत्रांची जमवाजमव केली. त्यांच्या नावे बँकेत खातीही उघडली. त्यानंतर मनरेगाअंतर्गत होणारे दगडी बंधारे, वृक्ष लागवड, माती बंधारे, पाणवठे, शौचखड्डे अशा कामांवर बोगस मजूर दाखवून मोठा अपहार केलाय. 

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण 2007 ते 2021 या कालावधीतील असल्यानं जवळपास दोन हजार मजूर बोगस दाखवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी फसवणूक झालेल्या लोकांकडून करण्यात येतीय. 

या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यानं यात काही बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच अपेक्षा...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live