मराठा आरक्षणाविरोधात मंत्री? मेटेंसह चंद्रकांत पाटलांचे 'या' मंत्र्यांवर आरोप

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020
  • मराठा आरक्षणाविरोधात मंत्री?
  • आरक्षणाविरोधात मराठा मंत्र्यांचच लॉबिंग?
  • विनायक मेटे आणि चंद्रकांत पाटीलांचा आरोप 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान पेटलेलं असतानाच विनायक मेटे आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या हेतुवरच शंका उपस्थित केल्यात. नेमके हे आरोप काय आहेत, पाहा -

मराठा समाजाविरोधात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचं लॉबिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलाय. 

"मराठा आरक्षणाला महाविकास आघाडी सरकारमधील 6 ते 7 मंत्र्यांचा विरोध असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा समाजाला दिलेलं आश्वासन पाळत नाहीत. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या सरकारमधील या मंत्र्यांचा वेळ की पर्दाफाश करू"

मेटे यांच्या आरोपाने खळबळ माजलेली असतानाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही तोच आरोप काहीशा वेगळ्या शब्दांत केलाय.

"मोठ्या मराठा नेत्यांना वाटतं की समाजाला कधी आरक्षण मिळू नये. या मोठमोठ्या नेत्यांना नेमकी कोणती भीती वाटतेय."

अगोदरच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली जातेय. त्यातच आता सरकारमधील मंत्र्यांवर आरोप होऊ लागल्याने सरकारच्या अडचणी नक्कीच वाढल्यात. त्यामुळे यातून निश्चित मार्ग न काढल्यास मराठा आरक्षण गमावल्याचं खापर ठाकरे सरकारवर फुटणार हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live