मिरज पोलिसांची कमाल!  24 तासात दुसरी कारवाई, गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त

विजय पाटील
रविवार, 30 मे 2021

या प्रकरणी  बाबासो पंडित तांबे, अजय शिंदे ही दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.

सांगली:  मिरजेत उपविभागीय पोलीस अधीक्षक पथकाने कर्नाटक महाराष्ट्र मार्गावर सापळा रचून  गोवा बनावटीची विदेशी दारू सह 7 लाखाचा  मुद्देमाल जप्त केला आहे. तर तीन आरोपी पळून गेले आहेत. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिरज पोलिसांची 24 तासात ही दुसरी कारवाई आहे. (Miraj police have seized foreign liquor made in Goa)

धक्कादायक! नंदुरबारमध्ये कोरोना काळात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ

सुमो मधून गोवा बनावटीची विदेशी दारूचा मोठा साठा आणला जाणत असल्याची माहिती मिरज पथकाला मिळाली होती. त्यानुसार मिरज विजय नगर म्हैसाळ रस्त्यावर सापळा रचून पांढऱ्या रंगाची टाटा सुमो पोलिसांनी अडवली असता त्यामध्ये असलेल्या चौघांनी सुमो गाडी तिथेच सोडून पळ काढला. पथकाने सुमो गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला.  2 लाख 12 हजार 480 रुपये किंमतीची विदेशी दारू तर मोबाईल, आणि पाच लाख रुपये किंमतीची टाटा सुमो असा तब्बल 7 लाख 17 हजार 480  रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

अनिल परब आता दोन महिन्यांचे पाहुणे - किरीट सोमैय्या

या प्रकरणी  बाबासो पंडित तांबे, अजय शिंदे ही दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. बाबासो तांबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय शिंदे व दोन अनोळखी इसम अद्याप फरार आहेत. सलग दोन दिवस  बेकायदेशीर विनापरवाना गोवा बनावटीची दारू साठा  सापडल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग गंधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांनी आज कारवाईची माहिती दिली आहे.

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live