आमदार आकाश फुंडकर रमले रंग रेषांच्या दुनियेत!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 डिसेंबर 2018

खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर आज चक्क विद्यार्थ्यांसोबत बसून सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. आमदार फुंडकर यांना हातात कुंचला घेऊन चित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते सुद्धा बच्चे कंपनी सोबत रंग रेषा आणि कल्पनाविश्वात रमले.

चित्रकलेची आवड प्रत्येकाला असते. चित्राने मनातले भावविश्व कागदावर उलगडून मांडन्याचा हा अनुभव काही औरच असतो. आज अनेक मान्यवरांनीही हा अनुभव घेतला. निमित्त होते सकाळ चित्रकला स्पर्धा.देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय चित्रकला स्पर्धा आज घेण्यात आली. खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी विविध केंद्रावर जावून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता एका केंद्रावर आमदार आकाश फुंडकर यांना विद्यार्थ्यांनी चित्र काढण्याचा आग्रह धरला. लहानग्या मुलांचा आग्रह पाहता आमदार अँड फुंडकर यांनी एक चित्र काढून त्यांच्या उत्साह वाढविला. ' स्कुल चले हम' चे सुंदर चित्र आमदार फुंडकर यांनी काढले. आमदार स्वतः आपल्या सोबतच चित्र काढायला बसल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. दरम्यान सकाळचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा असल्याचे आमदार अँड आकाश फुंडकर म्हणाले.

Web Title: MLa Akash Fundkar participate in Sakal Drawing Competition

संबंधित बातम्या

Saam TV Live