धीरज देशमुख का झाले भावूक?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

लातूर : लातूर ग्रामीणचे आमदार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित आणि धिरज देशमुख यांची सर्वत्र चर्चा आहे. सख्खे भाऊ आणि तरूण आमदार म्हणून त्यांचा बोलबाला आहे. अशातच काल (ता. 26) धिरजने इन्स्टाग्रामवर एक भावनिक फोटो शेअर केलाय. 

धिरजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या लातूरमधील घरात विलासरावांच्या फोटोसमोर हात पसरून धीरज उभा आहे. त्याच्या पांढऱ्या कपड्यावर मागे गुलालाने भरलेला हाताचा पंजा आहे. या फोटोला 'आज जर मी सर्वांत जास्त काय मिस करत असेल, तर ते म्हणजे तुमची मिठी. पण मला मिळालेल्या प्रत्येक मतात तुमचा आशीर्वाद आहे पप्पा. मी माझ्या जनतेची मनोभावे सेवा करेन.' असे कॅप्शन दिले आहे.
 
हा फोटो कालपासून प्रचंड व्हायरल होत आहे. या भावनिक फोटोमुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आलेत, तर अनेकांना विलासरावांची आठवण आली.  

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत धिरज आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ अमित या दोघांनाही भरघोस मते मिळाली. विलासरावांची पुण्याई आणि या भावंडांचे काम बघून लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिले आहे. त्यांच्या प्रचारात त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया देशमुखही सहभागी होत

Web Title: MLA Dhiraj Deshmukh Photo gets viral on social media

संबंधित बातम्या

Saam TV Live