खो-खो चा खेळ चालू आहे यांचा, आमदार राजू पाटील यांची सरकारवर टीका

raju patil
raju patil

डोंबिवली - गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्येDombavali लसीकरणाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. याच गोष्टीवरुन भाजपा आमदार रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देत शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे Dipesh Mhatre यांनी आमदारांना प्रतिउत्तर देत केंद्र सरकारवर टीका केली. याच लसीच्या राजकारणावरुन मनसे आमदार राजू पाटील  MLA Raju Patil  यांनी सरकारला टोला लगाविला आहे. "खो-खोचा  Kho Kho खेळ चालू आहे यांचा" राज्य सरकारने State Government लसीकरणाचा वेग वाढवावा, कोविड सेंटरच्या मागे लागण्यापेक्षा हा आजार आता कसा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहीजे. त्याचप्रमाणे तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात लसीकरण केले पाहीजे अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. MLA Raju Patil on state government 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोरोना रुग्णालयात पी एम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटर पैकी 6 व्हेंटिलेटर सदोष असल्याचे दुरुस्ती दरम्यान स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यात सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील 7 आणि आर्ट गलरी मधील 8 व्हेंटिलेटर  बंद पडल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी तज्ञ इंजिनिअरला बोलविण्यात आले. दुरुस्ती दरम्यान यातील 6  व्हेंटिलेटर मधील गंभीर बाब उघड झाली.

हे देखील पहा -

संबधित इंजिनिअरने तसा अहवाल पालिका आयुक्तांना दिला आहे. या अहवालात दुरुस्ती साठी आलेल्या 6 व्हेटीलेटर कंपनीकडून सदोष धाडण्यात आले असल्यामुळे रुग्णालयातील सर्वच व्हेंटिलेटर  तज्ञ इंजिनिअर कडून तपासून घेतले जावेत कारण त्याचा रुग्णाच्या जीवाशी संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि तसे पत्र सुद्धा मंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. MLA Raju Patil on state government 

कल्याण डोंबिवली महापालिका कोवीड रुग्णालयाला पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर सदोष असल्याच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.

पीएम केअर फंडामधून केडीएमसीच्या कोविड रुग्णालयांना 80 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. गेले वर्षभर या व्हेंटिलेटरद्वारे कोवीड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र गेल्या महिन्यात यापैकी काही व्हेंटिलेटर बंद पडल्याने दुरुस्तीदरम्यान त्यातील काही व्हेंटिलेटर सदोष असल्याचा अहवाल तज्ञ इंजिनिअर्सनी केडीएमसीला दिल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून हलगर्जीपणा झाला असून यामूळे ज्या रुग्णांचा जीव गेला असेल त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.  MLA Raju Patil on state government 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com