अमरावतीच्या लसीकरणाबाबत रवी राणा आक्रमक

अरुण जोशी
मंगळवार, 4 मे 2021

जिल्ह्यातील Amravati कोरोनाच्या भयावह परिस्थिती बाबत आमदार रवी राणा यांनी आज  महाराष्ट्र Maharashtra राज्याचे मुख्य सचिव सीताराम  कुंटे यांची भेट घेऊन चर्चा केली

अमरावती : जिल्ह्यातील Amravati कोरोनाच्या भयावह परिस्थिती बाबत आमदार रवी राणा यांनी आज  महाराष्ट्र Maharashtra राज्याचे मुख्य सचिव सीताराम  कुंटे यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत आमदार राणा Ravi Rana यांनी अमरावती जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शन,ऑक्सिजन ची कमतरता,बेडची अपुरी संख्या, व्हेंटिलेटर चा तुटवडा व डॉक्टर, नर्सेस ,आरोग्य सेवक यांची अपुरी संख्या हे सर्व मुद्दे मांडले. MLA Ravi Rana Aggressive over Vaccination of Amravati District

या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन तातडीने  उपाययोजना करण्याची आमदार रवी राणा यांची मुख्य सचिवांकडे Chief Secretary मागणी केली. केंद्राकडून लसी Corona Vaccine मिळून सुद्धा अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच - सहा दिवसापासून लसीकरण बंद आहे. भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून सुद्धा नागरिकांना लस उपलब्ध नसल्यामुळे निराश होवून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यात सुद्धा लसीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत, असे सांगत अमरावती जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचे आमदार रवी राणा यांनी मुख्य सचिवांचे निदर्शनास आणून दिले. 

महाराष्ट्र सरकारमध्ये महत्वाचे खाते सांभाळणाऱ्या व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या मंत्र्यांना या बाबतचे गांभीर्य नसून त्या प्रभाव शून्य असल्याने  अमरावती जिल्यासाठी  आवश्यक असणारा रेमडिसिवीर Remdisivir साठा वळता करण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी यावेळी केला.

हे देखिल पहा - 

अमरावती महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला चांगला प्रतिसाद

या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना न केल्यास व अमरावती जिल्ह्याला न्याय न मिळाल्यास येणाऱ्या काही दिवसात आपण मुख्य सचिवांच्या दालनातच तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी यावेळी दिला. MLA Ravi Rana Aggressive over Vaccination of Amravati District

मुख्य सचिव  सीताराम कुंटे यांचे दालनात झालेल्या या बैठकीत आमदार रवी राणा यांचे समवेत अपर मुख्य सचिव(गृह) श्री मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव श्री लिमये आरोग्य संचालक, अपर मुख्य सचिव (आरोग्य) श्री प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.
Editd By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live