विजयानंतर रोहित पवार यांनी घेतलं विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पंढरपूर : कर्जत जामखेड मतदार संघातून विजयी झालेले रोहित पवार यांनी रात्री उशिरा विठ्ठल रूक्मिणीचे सहकुटूंब दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुखी ठेव आणि सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याचे बळ मिळू असे विठ्ठलाला साकडे घातल्याचे रोहित पवार यांनी दर्शनानंतर सांगितले.

राज्यात कॉग्रेस कमी पडली का असे विचायले असता ते म्हणाले, काँग्रेसचे राज्यातील नेते आपल्या आपल्या मतदारसंघात प्रचार करत राहिले. पण राष्ट्रीय स्तरावरील राहूल गांधी, प्रियांका गांधी जर प्रचाराला आले असते तर दहा बारा जागा वाढल्या असत्या अस म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष काँग्रेसबाबत नाराजीच वक्तव्य केली.

विजयानंतर रोहित पवार राम शिंदे यांच्या घरी; घेतले आईचे दर्शन (व्हिडिओ)

उदयनराजे यांना विरोध हा होताच. पण ते राष्ट्रवादीत असल्याने तो जाणवला नाही. ते वेगळ्या पक्षातून लढल्याने तो त्यांना समजला असं त्यांनी राजेंच्या परावभाव नंतर प्रतिक्रिया दिली.

Web Title: MLA Rohit Pawar visits Vitthal temple Pandharpur after Vidhansabha Victory

संबंधित बातम्या

Saam TV Live