मनसेचे सिडको व राज्य सरकारविरुद्ध 'बोंबा मारो आंदोलन'; पाहा VIDEO

mns
mns

सिडकोने (CIDCO) २०१८-१९ मध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी १८००० घरांची लॉटरी काढली होती. या लोकांना सिडकोने सांगितल्या प्रमाणे ऑकटोबर २०२० ला घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंत,  ६००० सिडको सोड्तधारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घरांचा ताबा अजून सिडकोने दिलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आंदोलनाचा इशारा दिल्यांनतर सिडकोने १ जुलै पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचे मंजूर केले. त्यामुळे या ६००० हजार सोड्तधारकांना तब्बल ९ महिन्याने घराचा ताबा उशिराने मिळत आहे.

सर्व सोड्तधारकांनी कर्ज काढून सिडकोमध्ये पैसे भरले होते. या घरांचे नियमित हप्ते या सोड्तधारकांना भरावे लागत आहेत. तसेच घर नसल्यामुळे भाड्याचे सोडतधारकांना पैसे हि देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे सोड्तधारक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये  सिडको या सोडत धारकांना देखभाल  आणि दुरुस्तीच्या खर्चापोटी आकारात असलेले ५८ हजार रुपये माफ करावे लागले आहेत, अशी रास्त मागणी हे सोड्तधारक करत आहेत. याविरुद्ध मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात आणि हजारो सोड्तधारकांनी घरी बसून बोंबा मारो आंदोलन केले.(MNS agitated against CIDCO and the state government)

हे देखील पाहा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२ मे रोजी त्या संदर्भात पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना पाठवले होते. त्यावर अजून सिडकोचे उत्तर आले नाही. २६ मे रोजी #CidcoWaiveOffOtherCharges हा हॅशटॅग सोशल मिडियावर वापरून सिडको आणि राज्य सरकार विरोधात जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास ७ हजार ट्विट करण्यात आले. यावरून सिडको सोड्तधारकांचा सरकारविरुद्ध रोष दिसून येतो. या मोहिमेनंतर सुद्धा सरकारला अजून जाग येत नसल्याने आता निषेधाचे दुसरे हत्यार सिडको सोड्तधारक नवी मुंबई (New Mumbai) मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसलेले आहे.

हजारो सिडको सोड्तधारकांनी सरकार आणि सिडकोला झोपेतून जागे करण्यासाठी बोंबा मारो आंदोलन केले. या अनेक सोड्तधारकांनी आपल्या परिवारासोबत घरातूनच निषेधाचे फलक दाखवले आणि आपला निषेध व्यक्त करून बोंबा मारून व्हिडिओ तयार केले. या आंदोलनाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडिया वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे, सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना टॅग करून मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. आंदोलन करताना काही सोड्तधारकांनी अभिनेत्याच्या आवाजात मिमिक्री करून आपली मागणी मांडली , तर काहींनी व्यंगचित्रे काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. सोड्तधारकांनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन परिवारासोबत बोंबा मारो आंदोलन करून आपल्या भावना किती तीव्र आहेत, ते दाखवून दिले.

सोबत मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे आणि सहकाऱ्यांनी सीवूड्स मधील नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर बोंबा मारो आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी काळी फीत बांधून बोंबा मारो आंदोलन केले. "सिडकोने देखभाल दुरुस्ती खर्च माफ केलाच पाहिजे केलाच पाहिजे", "आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा", "राज्य सरकार जागे व्हा..जागे व्हा...जागे व्हा " अशा घोषणा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. आमदार निवासाच्या दुरुस्ती साठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते, परंतु गोर गरीबांचे हक्काचे पैसे माफ करायला सरकार कडे पैसे नाहीत हि शोकांतिका आहे. अशी प्रतिक्रिया गजानन काळे यांनी दिली.

मनसेच्या या आंदोलनात उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, सचिन आचरे, शहर सह सचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष किरण सावंत, रोजगार सेना शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर संघटक सागर नाईकरे उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने बोंबा मारो आंदोलन केल्या नंतर सरकार आणि सिडकोने देखभाल दुरुस्ती खर्च माफ नाही केला तर पुढचे आंदोलन मंत्र्यांच्या घरी करू असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी राज्य सरकारला दिला.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com