ऍमेझॉनविरोधात मनसे आक्रमक, मनसेकडून ऍमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड

साम टिव्ही
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020
  • पुण्यात मनसे ऍमेझॉन विरोधात आक्रमक झाले असून पुण्यातील कोंढव्यातील कार्यालयाची तोडफोड केली.
  • कोंढव्यातील कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घुसले.

पुणे :- पुण्यात मनसे ऍमेझॉन विरोधात आक्रमक झाले असून पुण्यातील कोंढव्यातील कार्यालयाची तोडफोड केली. कोंढव्यातील कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घुसले. त्यानंतर प्रथम त्यांनी कार्यालयातील इंग्रजी फलकांना काळं फासलं. मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी ऍमेझॉनच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी ऍमेझॉनकडे केली होती. कारण असे केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते वेबसाईटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील असे मनसेचे म्हणणे होते. परंतु, ऍमेझॉनकडून या मागणीचे सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे, मनसे कार्यकर्त्यांनी ऍमेझॉनविरोधात मोहीम हाती घेतली. त्यानुसार, 'नो मराठी, नो ऍमेझॉन' म्हणत कार्यकरते आक्रमक झाले आणि त्यांनी खलकट्याक केलं. ऍमेझॉनची जी मजोरी चालली आहे, जो मराठी व्देष केला जात आहे. ही कंपनी मुजोरी दाखवत आहे. आता मनसे यांना सह्याद्रीच पाणी पाजणार आणि ऍमेझॉनची मुजोरी या पुढे ही अशीच सुरू राहिली तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live