VIDEO | राज ठाकरेंनी केलं अमित शहांच अभिनंदन आणि म्हणाले ....

VIDEO | राज ठाकरेंनी केलं अमित शहांच अभिनंदन आणि म्हणाले ....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य केले आहे. या मुद्यावरून राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. अमित शहा यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी अशी खेळी खेळली की देशात आर्थिक मंदी असताना लोकांचे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व कायदा आणला, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.  


नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे. असले कायदे आणून गोंधळ करायची गरज नव्हती. आधार कार्ड या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध करू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय? इतर देशातील लोकांना सामावून घ्यायला भारत काही धर्मशाळा नाही.१३५ कोटी लोकसंख्येच्या देशाला आणखी काही नागरिकांची गरज आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन, तुम्ही आर्थिक मंदीवरून लक्ष हटविण्यात यशस्वी ठरला. देशातील नागरिकांचे विषय आधी मिटवा. नंतर बाहेरच्या नागरिकांना येथे आणा, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: MNS Chief Raj Thackeray attacks Amit Shah on CAA in Pune
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com