मनसेला टाईमपास टोळी म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंमा संदिप देशपांडेचं सडेतोड प्रत्यूत्तर

साम टीव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विक्रोळी येथील मनसे विभाग प्रमुख शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विक्रोळी कन्नमवार नगर येथे शिवसेना पक्षाचे नगरसेवक हे स्थानिक फेरीवाल्याकडुन दररोज दहा रुपये गोळा करतात, असे पत्रकारांना सांगितले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार उत्तर दिलंय. महापौर बंगला हडप करून त्याचं स्मारक बनवण्याऐवजी फुटबॉल खेळणे म्हणजे टाईमपास असा टोला आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी लगावलाय. 

नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे पाहा हा व्हिडिओ - 

विक्रोळीतील शिवसेना नगरसेवक फेरीवाल्यांकडून दररोज दहा रुपये गोळा करत असल्याच्या मनसेच्या आरोपानंतर आता शिवसेना व मनसेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाॅर सुरु झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेची टाईमपास गँग अशी संभावना केल्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. 

विक्रोळीचे शिवसेना नगरसेवक स्थानिक फेरीवाल्यांकडून रोज पैसे गोळा करत असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला असून यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. वीरप्पनने देशाला जेवढे लुटले नसेल, तेवढे मुंबई मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी लुटलंय असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता.

हेही वाचा -

राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? प्रस्तावावर शिवसेनाही अनुकूल, वाचा पुढे कशी असतील राजकीय समीकरणं?

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विक्रोळी येथील मनसे विभाग प्रमुख शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विक्रोळी कन्नमवार नगर येथे शिवसेना पक्षाचे नगरसेवक हे स्थानिक फेरीवाल्याकडुन दररोज दहा रुपये गोळा करतात, असे पत्रकारांना सांगितले. या पावतीवर बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो असून पैसे गोळा करताना स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते हे पैसे महानगरपालिका व पोलिसांसाठी आहेत, असे सांगत असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला होता.

त्यावर मनसेही टाईमपास गँग असल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी संदीप देशपांडेंची खिल्ली उडवली होती. आता संदीप देशपांडेंनी ट्वीट करत त्याला प्रत्त्युत्तर दिले आहे.  सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर  निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात, असे ट्वीट करुन संदीप देशपांडेंनी शिवसेनेला छेडले आहे.  यावर महापौर बंगला हडप करून त्याचं स्मारक बनवण्याऐवजी फुटबॉल खेळणे म्हणजे टाईमपास असा टोला आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live