'मनसे'ने केले अर्थसंकल्पाचे कौतुक; पुढच्या दिशेचे संकेत?

'मनसे'ने केले अर्थसंकल्पाचे कौतुक; पुढच्या दिशेचे संकेत?

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून टिका होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा चेहरामोहरा बदलत राजकीय भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्यामुळे मनसे वैचारिक दृष्टया भाजपच्या जवळ जात आहे का, यावर राजकीय वर्तुळात चर्चासुरू असतानाच केंद्रीय अर्थसंकल्पाचे समर्थन करत मनसे नेत्यांनी आगामी राजकीय दिशा स्पष्ट केल्याचे माणण्यात येते.

मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावर यांनी काल शुक्रवारी प्रतिक्रिया देताना केंद्राकडून काही अपेक्षा व्यक्‍त केल्या होत्या. नांदगावकर म्हणाले होते की, "उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे, सध्या सगळीकडे मंदीचे वातावरण आहे व त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे, त्यामुळे अर्थमंत्र्यांनी काही दिलासादायक निर्णय नक्कीच घ्यायला हवे. जेणेकरून अर्थव्यवस्था परत रुळावर येईल. सध्या अनेक बॅंका या अडचणीत येऊन ठेवीदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे एक निर्णय प्रकर्षाने घ्यायला हवा आणि तो म्हणजे ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर मिळणारे विमा संरक्षण फक्त 1 लाखापर्यंतच आहे, याची व्याप्ती वाढवून 5 लाखापर्यंत करावी. तसचे प्राप्तीकर देखील मध्यमवर्गीयांसाठी महव्त्वाचा विषय आहे, बाबतीतही सरकारने मध्यमवर्गीयांना दिलासा दयावा. बेरोजगारी कमी करण्याबद्दल काही तरी ठोस पाऊले उचलावी. तसेच शेतकरी बांधवांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्यास आत्महत्येचे सत्र कसे थांबवता येईल याची काळजी घ्यायला हवी,''

आज अर्थसंकल्प सादर झाल्यावर बाळा नांदगावकर यांनी केंद्र सरकारचे स्वागत केले आहे. नांदगावर यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, "आम्ही केलेल्या मागण्या जशाच्या तशा मान्य केल्याबदल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार.यामुळे बॅंकेतील ठेवीदारांना आणि कर भरणा-या मध्यमवर्गाला दिलासा मिळेल. सरकारचा हा निर्णय स्तुत्य आहे, आणि आम्ही मनापासून स्वगात करतो."

WebTittle ::  MNS Leader Bala Nandgaonkar Welcomes Union Budget

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com