केंद्र व राज्याचे सरकार नालायकच - मनसे आमदार राजू पाटलांचा हल्लाबोल

प्रदीप भणगे
रविवार, 18 एप्रिल 2021

केंद्र व राज्य दोन्ही सरकार नालायक निघाली अशी टीका करत मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत सांगितलंय, कीआपण आपली कामं करू या, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करू या...

डोंबिवली : केंद्र व राज्य Maharashtra दोन्ही सरकार नालायक निघाली अशी टीका करत मनसे MNS आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत सांगितलंय, कीआपण आपली कामं करू या, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करू या...MNS MLA Raju Patil Criticism on Central And Maharashtra State Government 

सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचे Corona रुग्ण वाढत आहेत.त्यांना वैद्यकीय सुविधा मिळताना हाल होत आहेत.मात्र केंद्र आणि राज्य सरकार मधील सत्ताधाऱ्याकडून राजकारण Politics आणि टीकाटिपणी वारंवार केली जात असल्याचे आपण पाहत आहोत.केंद्रात भाजप सत्ता आहे आणि राज्यात महाविकास आघाडीची त्यामुळे समाज माध्यमावर Social Media कोविड वरून सुद्धा भाजप कार्यकर्ते विरुद्ध शिवसेनेचे कार्यकर्ते भांडताना दिसत आहेत.

मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Corona Second Wave सामान्य माणसाचे हाल झाले आहेत.तर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये काही जण केंद्रातील भाजपवर टीका करत आहेत तर काही कार्यकर्ते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत.त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसे मध्यवर्ती, डोंबिवली या Whatapp ग्रुपवर गुजरात राज्याचे पत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पत्र टाकत.केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत मनसेच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे...MNS MLA Raju Patil Criticism on Central And Maharashtra State Government 

मनसेच्या कार्यकर्त्यांना आमदार राजू पाटील काय म्हणाले पहा.....

जसं गुजरात एफडीएने पत्र दिले तसेच पत्र महाराष्ट्र एफडीएने दिले आहे.राजकारण दोन्हीकडून सुरु आहे.लोक मरत आहेत आणि तिथे वेगळेच राजकारण सुरु आहे.केंद्र व राज्य दोन्ही सरकार नालायक निघाली आहेत. आपण आपली कामं करू या, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करू या व आपल्या पक्षातले सहकारी काम करत आहे त्यांच्या बद्दल बोलू या....

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live