डास झाले म्हणून कुणी घराला आग लावते का? - राजू पाटलांचा सवाल

MNS MLA Raju Patil
MNS MLA Raju Patil

डोंबिवली :  राज्य सरकार कॉन्टक्ट ट्रेसिंग (Contact tracing) बद्दल एकदम शून्य आहे. त्यामुळे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात (Maharashtra) झपाट्याने कोरोना (Corona) वाढतो. हे सरकारचे अपयश आहे.अशी टीका मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील यांनी केली आहे. MNS MLA Raju Patil says Corona is increasing in the state due to zero contact tracing

सुरुवातीपासून कोरोना आजाराविषयी नागरिकांध्ये संभ्रम होता. बाधितांची नावे जाहीर केली जात नव्हती. मात्र आत्ता तशी परिस्थिती नाही. सरकारने रोजच्या रोज कोरोना (Corona) बाधितांची यादी जाहीर करावी. तशा प्रकारचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावे. कोरोना बाधितांची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करुन घेण्यास पुढे येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे.

यामुळे अन्य लोकही सावध होतील. त्याचबरोबर कोरोनाची आकडेवारी येत आहे. ती खोटी की खरी याची शहानिशा होण्यास मदत होईल. कोरोना वाढतोय म्हणून सरसकट सामान्य जनतेला लॉकडाऊनमध्ये (Lockdown) ढकलण्यापेक्षा जे बाधित व संपर्कात आलेले आहे. त्यांच्यावर लक्ष देण् सोपे होईल. कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छ ठाकरे सरकारची आहे असे मानून सरकार (Government)  निर्णय घेईल अशी आशा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महापालिका सुरुवातीला कोरोना बाधितांची नावासह यादी जाहीर करत होती. त्यानंतर ही यादी देणे बंद केले. केवळ आकडेवारीच दिली जात आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात (Private Hospitals) बेडची कमतरता आहे. रुग्णालयात किती बेड (Beds) आहेत. किती रिक्त आणि किती भरलेले आहेत. याची माहिती डॅशबोर्डवर (Dashboard) दिली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

तशी माहिती दिली जात होती. मात्र महापालिकेच्या (Municipal Corporation) हद्दीत कोरोनाची खाजगी रुग्णालये आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर गेल्यास उपलब्ध बेडचा डॅशबोर्डचा तक्ता पाहिल्यास अनेक रुग्णालये त्यांची माहितीच अपडेट करत नसल्याने उपलब्ध बेड किती आहे याची माहिती मिळणे नागरीकांना कठीण होऊन बसले असल्याच्या मुद्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे. मनसे आमदार यांनी केडीएमसी आयुक्त यांना पत्र देत काही सूचना केल्या आहेत. MNS MLA Raju Patil says Corona is increasing in the state due to zero contact tracing

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व कोरोना संसंर्ग रोखण्यासाठी तातडीने नियोजनबद्ध पावले उचलणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने मी काही सुचना आपणास करीत आहे. अर्थात यातील काही गोष्टी व उपाय योजनांवर आपण काम करत असालच याची खात्री आहे. असे म्हटले असून काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे- 

१) तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली कोव्हीड केंद्रे (Covid centers) टप्प्याटप्प्याने पुन्हा कार्यान्वित करण्यास सुरूवात करायला हवीत. जसे कि टिटवाळा येथील रुक्मिणी गार्डन संकुल येथील कोविड दवाखाना.  

२) यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली असेलच परंतु त्यांना आश्वासक वाटेल असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे.

३) या सर्व उपाययोजना कालबध्द रितीने सुलभ व गतीमानतेने पार पाडण्यासाठी आपल्या देखरेखीखाली सर्व विभागांसाठी विभाग प्रमुख दर्जाचे "समन्वय अधिकारी" नियुक्त करावेत. 

४) या समन्वय अधिका-यांनी आपल्या विभागातील कोव्हीड केअर (Covid care) सेंटर, कोव्हीड केअर हेल्थ सेंटर व कोव्हीड केअर हॉस्पिटल या संदर्भातील अडीअडचणी उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधीतांशी समन्वय राखायला हवा, त्याचप्रमाणे कोव्हीड 19 बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीशोध संदर्भात करावयाच्या कामकाजाबाबतही समन्वय ठेवायला हवा. व्यक्तीशोधा बाबत आपण खुपच कमी पडतो हे मी स्वत: अनुभवत आहे कारण मी बाधीत झाल्यानंतर मला आरोग्य विभागाकडून कॉन्टक्ट ट्रेसिंग बाबत काहीच विचारणा झाली नाही यावरून अनुभवले आहे. सामान्य कोरोनाबाधीतांच्या कॉन्टक्ट ट्रेसिंग बद्दल तर आपली यंत्रणा अगदीच कमी पडते आहे व तेच कोरोना पसरण्याला जास्त कारणीभूत ठरत आहे. म्हणून संपुर्ण जनतेवर सरसकट बंधन आणून नाही तर कॉन्टक्ट ट्रेसिंग वर भर देऊनच आपण ही साथ आटोक्यात आणू शकतो असा मला विश्वास आहे.

५) गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची जबाबदारी सोसायटी पदाधिका-यांवर निश्चित करण्यात यावी. तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तीच्या हातावर स्टॅंप मारण्यात यावेत व गृह विलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा. MNS MLA Raju Patil says Corona is increasing in the state due to zero contact tracing

६) आपआपल्या विभागातील कंन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीबाबत संबंधीत महापालिका अधिकारी व पोलीस यांच्याशी समन्वयाची भूमिका बजावयाला हवी. त्यासोबतच आपल्या विभागातील नागरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालये,रेल्वे स्टेशन, मोबाईल टेस्टींग कॅम्प (नसल्यास सुरू करावे ) याठिकाणी होणा-या आरटी-पीसीआर / रॅपीड अँटीजन टेस्ट या चाचण्यांबाबत नियोजन व नियंत्रणाची भूमिका पार पाडावयास हवी. 

७) दोन्ही शहरात मोठ मोठे निवासी सुंकुल आहेत तिथले क्लबहाउस एक-दोन आठवड्यासाठी ताब्यात घेऊन तिथेच तात्पुरत्या सोयी उपलब्ध करून खाजगी संस्था, डॅाक्टर्स, रोटरी, लायन्स सारखे क्लब यांच्या मदतीने त्या त्या संकुलांपुरते लसीकरण चालू केल्यास लसीकरण जलद होण्यास मदत होईल. तशी परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा करवा, शक्य असल्यास घरोघर जाऊन लसीकरण मोहीम अधिक व्यापक करता येईल का यावर विचार करावा.

८) बेड्सची उपलब्धता दाखवणारा डॅशबोर्ड अजूनही आपल्या सोशल मीडिया किंवा संकेतस्थळावर दिसत नाही, तो व त्याचप्रकारचा लसीकरणाची व्यवस्था आणि उपलब्ध साठा दर्शविणारा डॅशबोर्ड लोकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर उपलब्ध करावा. जेणेकरून बेडसाठी आणि लसीकरणासाठी लोकांचा गोंधळ उडणार नाही. 

९) याशिवाय आपल्या विभागात कार्यान्वित असलेल्या सर्व कोव्हीड 19 लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी होणा-या लसीकरणाचा दैनंदिन आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण होणेबाबत नियोजन करून कार्यवाही केल्यास याव्दारे कोव्हीड 19 च्या उपाययोजनांवर समन्वय अधिकारी यांचे प्रभावी नियंत्रण राहून त्यांची अंमलबजावणी अधिक सुनियोजित रित्या करणे शक्य होणार होईल.

१०) सर्व तात्पुरते उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे फायर सेफ्टी ॲाडिट करून घेणे. MNS MLA Raju Patil says Corona is increasing in the state due to zero contact tracing

सध्या प्रचंड प्रमाणात पसरणाऱ्या कोरोना विरूद्ध सर्वांनी एकत्रित विचारविनिमय करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोव्हीडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टनमेंट क्षेत्राचे व्यवस्थापन व कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध ( contact tracing ) या दोन महत्वाच्या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे हे मी मुद्दामहून पुन्हा अधोरेखित करत आहे. घरात डास झाले तर कोणी घराला आग लावतो का ? सरसकट लॅाकडाऊन हा कोरोना प्रसार रोखण्यावर आतातरी उपाय होऊ शकत नाही. कोरोना होतो व योग्यवेळी उपचार घेतल्यास तो लगेच पूर्ण बरा होतो हा विश्वास पण लोकांमध्ये निर्माण व्हायला हवा. कधी कधी एखादी लहानशी सुचना देखील प्रभावी काम करून जाते त्या अनुषंगाने मी काही सुचना केल्या आहेत. मी पण सध्या कोरोनावर उपचार घेत आहे, ते पूर्ण झाल्यावर लवकरच प्रत्यक्षात आपली भेट घेऊन चर्चा करेन. MNS MLA Raju Patil says Corona is increasing in the state due to zero contact tracing

Edited by- Sanika Gade. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com