मनसे आमदार राजू पाटील यांनी 'यासाठी' मानले नितीन गडकरींचे आभार

MNS MLA Raju Patil meeting with Nitin gadkarry
MNS MLA Raju Patil meeting with Nitin gadkarry

डोंबिवली :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkary यांनी कल्याण - निर्मल रस्त्याच्या निर्मितीसाठी ४८.६१ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल मनसे आमदार राजू पाटील Raju Patil यांनी गडकरी यांचे आभार मानले आहेत. मनसेचे MNS आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी डोंबिवली-मुंब्रा रेल्वे Railway समांतर रस्ता व्हावा अशी मागणी केली होती. MNS MLA Raju Patil Thanked Nitin Gadkary

गडकरी यांनी १७ एप्रिलला आमदार राजू पाटील यांना पत्र पाठवलं. माझ्या विभागानं २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात Budget ग्रामीण विभागात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. त्या अंतर्गत कल्याण - निर्मल रस्त्याच्या निर्मितीसाठी ४८.६१ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे, असे गडकरी यांनी राजू पाटील यांना कळवले.

तसेच सध्या एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गा National Highway अंतर्गत येणाऱ्या रस्त्याला निधी देतो असा शब्द पण गडकरींना दिला होता. तो शब्द अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाळला आहे. याबद्दल आमदार राजू पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मनसे राजू पाटील यांनी नागपूरात Nagpur जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. यावेळी राजू पाटील यांनी गडकरींना पत्र दिलं होतं. ''डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. तत्कालिन आमदार स्व.हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याच्या प्रस्तावाला गती मिळालेली नाही,'' असे राजू पाटील यांनी त्या पत्रात नमूद केले होते. MNS MLA Raju Patil Thanked Nitin Gadkary

''कल्याण, डोंबिवली व अन्य परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत असून या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून आणि खासगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. यामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. वास्तविक हा रस्ता झाला तर डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर अवघ्या ५ ते ७ मिनिटांवर येईल,'' असेही राजू पाटील यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिले होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com