अत्यवस्थ रुग्णांसाठी मनसेचे ‘मिशन श्वास’

Oxygen System
Oxygen System

मुंबई  : कोरोना Corona विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शहर आणि उपनगरातील आरोग्य Helath व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा श्वास गुदमरू लागल्याने अंधेरी Andheri पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेने MNS अनोखा असा ‘मिशन श्वास’ उपक्रम हाती घेतला आहे. घरी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात पोचेपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. MNS In Mumbai To provide oxygen to needy patients 

ऑक्सिजनअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मनसे अंधेरी पश्चिम विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या संकल्पनेतून ‘मिशन श्वास’ संकल्पना सुरू करण्यात आली आहे. योजनेचे उद्घाटन मनसे सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे  Shalini Thakceray यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. 

हे देखिल पहा - 

उपक्रमानुसार आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन Oxygen सिलिंडरची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तो तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरी असलेल्या रुग्णांना अचानक ऑक्सिजनची गरज भासते. अशांची गरज ओळखून मनसेने अंधेरी पश्चिम मतदारसंघात सध्या पाच ऑक्सिजन सिलिंडर आणि त्यासोबत आवश्यक ती वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १३ लिटरचा एक सिलिंडर असून तो रुग्णांना मोफत पुरवण्यात येणार आहे. सर्व सोसायटी आणि विभागात बॅनरमार्फत उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. MNS In Mumbai To provide oxygen to needy patients 

आपत्कालीन परिस्थितीत प्राणवायूने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही स्वखर्चाने ‘मिशन श्वास’ उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार-खासदारांनी आपल्या निधीतून रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करून द्यावी - किशोर राणे, उपविभाग अध्यक्ष, अंधेरी पश्चिम
Edited By - Amit Golwalkr
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com