माझी चप्पल घालून चालून दाखवा- राज ठाकरे

वैदेही काणेकर
सोमवार, 9 मार्च 2020

सरकारनं चांगलं काम केलं तर कौतुकही करा असा सल्ला आज राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

नवी मुंबई - आज (9 March) नवी मुंबईतल्या वाशीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १४ वा वर्धापन दिन पार पडला. सरकारचे बाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली आहे .पण उगाच बाभाडे काढू नका, सरकारनं चांगलं काम केलं तर कौतुकही करा असा सल्ला आज राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडून कुणी अपेक्षा ठेवत नाही. मनसेकडून ठेवतात, माझी चप्पल घालून चालून दाखवा, असं म्हणत राज ठाकरेंनी सल्लागारांवर टीकादेखील केली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackery) यांनी पत्रकारांनाही टोला लगावला. राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. 

हेही वाचा - असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट, वाचा कुणाला कुठलं खातं

हेही वाचा - हेल्मेट न घातलेल्या मनसैनिकांवर कारवाई होणार?

 

दरम्यान, मनसेच्या या कार्यक्रमाआधी मनसेकडून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackrey)  यांनी वाशीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. 

 

पाहा राज ठाकरे 14 व्या वर्धापनदिनी नेमकं काय म्हणालेत - 

VIDEO - 

 

 

mns raj thackey on his own chappal navi mumbai shivsena bjp amit politics maharashtra amit thackrey election
 


संबंधित बातम्या

Saam TV Live