ठाकुर्ली पुलावर उभे राहून मनसे म्हणाले....एप्रील फूल्ल डब्बा गुल!

प्रदीप भणगे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गेल्या काहीं वर्षापासून कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombival) मधील पुलांचे  काम फार संथ गतीने चालू आहे.प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात मात्र पूल व्यवस्थित होत नाहीत. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम आद्यपही चालूच आहे. त्या विरोधात मनसेने आज आंदोलन केले

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमे मधील मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी आज 1 एप्रिल रोजी अर्धवट असलेल्या ठाकुर्ली पुलावर अनोखे आंदोलन केले. "एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल" अश्या घोषणा करत आणि केक कापून मनसेने आज आंदोलन करत प्रशासन आणि सत्ताधारी सरकारचा निषेध केला आहे. MNS unique agitation on Thakurli bridge against Administration

गेल्या काहीं वर्षापासून कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombival) मधील पुलांचे  काम फार संथ गतीने चालू आहे.प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात मात्र पूल व्यवस्थित होत नाहीत. ठाकुर्ली, पालवा, माणकोली, दुर्गाडी पुलाचे काम आद्यपही चालूच आहे. नागरिक आणि प्रवाशी हैराण झाले आहे. मात्र प्रशासन काही वेगाने काम करत नाही.

याचा निषेध म्हणून डोंबिवली (Dombivali) पश्चिमे मधील मनसे कार्यकर्त्यांनी आज 1 एप्रिल रोजी अनोखे आंदोलन केले आहे .यावेळी ."एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवले आमचे कल्याण-डोंबिवलीकरांचे पूल", "एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला ठाकुर्लीचा पूल" , "एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला पालवाचा पूल" , "एप्रिल फुल,डब्बा गुल, कुठे नेऊन ठेवला कोपरचा पूल" अश्या घोषणा दिल्या. MNS unique agitation on Thakurli bridge against Administration

या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश  भोईर, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे,संदीप म्हात्रे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, उपविभाग अध्यक्ष हिम्मत म्हात्रे, मनविसेचे शहर सचिव प्रितेश म्हामूणकर, प्रेम पाटील, संकेत सावंत,समीर पवार,समीर चाळके, भुषण आदी उपस्थित होते.

Edited By-Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live