रेमडिसेव्हरसाठी मनसेने केली 'ही' मागणी

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्खा झपाट्यानं वाढत असली, तरी या दोन्ही शहरात रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागलाय. त्यामुळे या शहरात रेमडिसेव्हीरसाठी वितरक नेमण्याची मागणी मनसेनं केली आहे

ठाणे : अंबरनाथ Ambarnath आणि बदलापूर Badlapur शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्खा झपाट्यानं वाढत असली, तरी या दोन्ही शहरात रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागलाय. त्यामुळे या शहरात रेमडिसेव्हीरसाठी Remedisivir  वितरक नेमण्याची मागणी मनसेनं केली आहे. MNS Wants Remedisivir Supplier for Ambarnath Badlapur

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड मिळणंही कठीण झालंय. अशातच बहुतांशी रुग्णांना फुफ्फुसातला संसर्ग आढळून येत असल्यानं रेमेडिसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. मात्र अंबरनाथ आणि बदलापुरात या इंजेक्शनचा अधिकृत वितरकच नाहीये. त्यामुळे इथल्या रुग्णांना कल्याण किंवा उल्हासनगरला जावं लागत असून तिथेही इंजेक्शन मिळेलच याची शाश्वती नसल्यानं रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताहेत.

या पार्श्वभूमीवर मनसेनं MNS अंबरनाथ बदलापुरात रेमेडिसिव्हीरचा अधिकृत वितरक नेमण्याची मागणी केलीये. तसंच अंबरनाथचे आमदार आणि खासदार डॉक्टर असतानाही रुग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती भीषण असून यात सुधारणा न झाल्यास आंदोलनं करणं हा आमचा अधिकार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय. या सगळ्याबाबत आम्ही अंबरनाथ पालिकेचे कोव्हीड नोडल ऑफिसर मेजर डॉ. नितीन राठोड यांना संपर्क साधला असता, अंबरनाथ पालिकेनं अन्न औषध विभागाच्या FDA अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र कुठूनही आपल्याला रेमेडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live