आर्थिक पॅकेजसोबतच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबद्दल मोदी म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 मे 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं. आर्थिक पॅकेजची घोषणा करताना त्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन जनतेला केलंय. 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजही घोषणा करतानाच त्यांना इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय.

 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना महत्त्वपूर्ण अशा आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी त्यांना आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकजची घोषणा केली. या पॅकेजच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या उद्योगांना उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे पॅकेज महत्त्वपूर्ण भूमिका बजावरणार आहे. 

संघटीत आणि असंघटीत मजुरांना या पॅकेजच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसत लघु आणि मध्यम उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न या पॅकेजद्वारे करण्यात येणार आहे. सध्याच्या काळात स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करुन त्यांचीच खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

आत्महनिर्भर अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजची माहिती अर्थमंत्र्यांकडून उद्यापासून दिली जाणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

18 मे पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपतोय. 18 मे आधी चौथ्या लॉकडाऊनबाबत मोदी माहिती देणार असून, त्याबाबत येत्या 5 दिवसांत काय महत्त्वपूण घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोरोनाची लढाई फार काळ चालणार असल्याचे सूतोवाच शास्त्रज्ञांनी दिल्याचं मोदींना म्हटलंय. त्या पार्श्वभूमीवर आता भविष्यात कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकानं तयार राहायला हवं, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

भारताची पुढची परिस्थिती कशी असेल, मोदींच्या भाषणाचं थोडक्यात विश्लेषण​, पाहा व्हिडीओ

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबत मोदी काय म्हणालेत  पाहा - 

पेट्रोल डिझेल महागणार?

दररोजच्या किंमतींच्या निरिक्षणानुसार किरकोळ किंमतीत झालेली वाढ तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची किंमत 50 टक्के जास्त आहे. लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  '16 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि यामुळे सरकारने किरकोळ उत्पादनांवर परिणाम न करता दोन्ही उत्पादनांवरील उत्पादन शुल्क वाढविले' अशी माहिती ओएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच सरकारी क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने आता दररोज किंमत सुधार योजना सुरू झाल्यानंतर ऑटो इंधन काही दिवस तेजीत येऊ शकेल असं म्हटलं आहे.  

 

 

 

modi addresses to nation announces on corona covid


संबंधित बातम्या

Saam TV Live