#coronavirusindia | कोरोनाशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची मोदींकडून घोषणा

ब्युरो रिपोर्ट
मंगळवार, 24 मार्च 2020

25 तारखेपासून ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यासोबतच अनेक महत्त्वाच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केल्या आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला घरातच राहण्याचं आवाहन केलं. तसंच आरोग्य सेवेला अधिक बळकट करण्यासाठी आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद नरेंद्र मोदी यांनी केल्याची घोषणादेखील केली. 

TWEET - 

 

25 तारखेपासून ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यासोबतच अनेक महत्त्वाच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केल्या आहेत.

 

मोदींचे महत्त्वाचे मुद्दे -

 • - कुणीही घराबाहेर पडू नका
 • - प्रत्येकाने पुढचे 21 दिवस घरीच थांबा
 • - बाहेर पडल्यानं तुम्ही कोरोनाला आमंंत्रण द्याल
 • - कोरोना प्रगत देशात सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने वेगाने पसरला
 • - कृपा करुन सोशल डिस्टन्सिंग पाळा
 • - एक चुकीचं पाऊल कोरोनाला तुमच्या घरात घेऊन येईल
 • - कोरोनाला आता रोखलं नाही, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होतील
 • - अनेकदा कोरोनाची लक्षणं लगेच दिसून येत नाही
 • - लक्षणं दिसत नाही म्हणजे कोरोना झालेला नाही, असा दावा करता येत नाही
 • - एकमेकांपासून शक्य तितकं अंतर ठेवा
 • - कोरोनाचा नवा संदेश - को- कुणाही, रो- रोडवर - नाही यायचं
 • - डॉक्टर्स, माध्यमकर्मी आणि यंत्रणेतील प्रत्येकाला सहकार्य करा
 • - अफवांना बळी पडू नका
 • - घाबरुन जाऊ नका
 • - जर आपण आता हे रोखलं नाही, तर 21 वर्ष मागे जाण्याची वेळ ओढावेल
 • - कोरोनाने आगीप्रमाणे वेगाने पसरतो, WHOचा महत्त्वाचा रिपोर्ट
 • - 11 दिवसांत कोरोना दुप्पट वेगाने पसरतो.

 

पाहा व्हिडीओ - नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

 

 

 

 modi addresses to nation announces special package to fight covid 19 marathi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live