यूएनमध्ये मोदी-जिनपिंग येणार आमने सामने, चीन असं देणार पाकिस्तानला बळ 

साम टीव्ही
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

 

  • यूएनमध्ये मोदी-जिनपिंग येणार आमने सामने
  • चीन देणार पाकिस्तानला बळ 
  • भारत कसं देणार चीनला प्रत्युत्तर? 

सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव सुरूंय. त्यातच आता यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमने सामने येणार आहेत. 

भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. सीमेवर चीन वारंवार कुरघोड्या करतोय. तर भारतीय जवानही चीनविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. त्यातच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ते संयुक्त राष्ट्राच्या महासभेकडे.

या महासभेच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमने सामने येणार आहेत. याआधी भारतानं संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा बुरखा फाडला होता. आता भारत-चीन तणावाची स्थिती असल्यानं चीन पाकिस्तानला पाठबळ देण्याची शक्यता आहे आणि तसं झालंच तर यानिमित्तानं मोदी पाकिस्तान आणि चीन दोघांनाही जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. आधीच चीनच्या कारवायांमुळे भारतात संतापाची लाट आहे. त्यामुळे यूएनमध्ये मोदी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेचं 75 वं सत्र 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान पार पडणारंय. या सभेत 25 सप्टेंबरला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलतील करतील तर 26 सप्टेंबरला नरेंद्र मोदी संबोधित करतील. कोरोना संकट, पाकिस्तानकडून सुरू असलेली घुसखोरी, सीमेवरील चीनच्या कुरघोड्या या पार्श्वभूमीवर साऱ्या देशवासियांचं मोदींच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय त्यामुळे यावेळची यूएनची महासभा खास असेल अशी आशा करायला हरकत नाही.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live