रामलीला मैदानावर आज मोदींची रॅली

साम टीव्ही न्यूज
रविवार, 22 डिसेंबर 2019

दिल्लीतील रामलीला मैदानावर आज होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. रामलीला मैदान जुन्या दिल्लीतील दरियागंजपासून एक किमी दूर आहे. रामलीला मैदानाचा परिसर नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.  सुमारे ५००० सुरक्षा कर्मचारी यासाठी तैनात केले जाणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा जवान , विमान विरोधी, ड्रोन विरोधी पथके हे कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करतील. 

दरियागंजमध्ये शुक्रवारी करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसाचार झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली. बैठकीत इतर गोष्टींबाबतही निर्णय घेण्यात आला. अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

रविवारी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. रामलीला मैदानावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि सुरक्षा निश्चित करण्यासाठी इमारतींवर विशेष जवान तैनात करण्यात येतील. दिल्ली पोलिस कार्यक्रमादरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष सुरक्षा समूह (एसपीजी) आणि भाजपशी संपर्कात आहेत. भाजप नेते विजय गोयल यांनी सांगितले की, दिल्लीतील १७३१ अनाधिकृत वसाहतींना कायदेशीर मान्यता दिल्याने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानण्यासाठी होत असलेल्या या रॅलीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. गोयल हे या रॅलीचे संयोजक आहेत..  
 
WebTittle :: Modi rally today at Ramlila Maidan

संबंधित बातम्या

Saam TV Live