BUDGET 2021 | मोदींचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या उडान योजनेला सफलता नाहीच! वाचा काय आहे स्थिती?

BUDGET 2021 | मोदींचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या उडान योजनेला सफलता नाहीच! वाचा काय आहे स्थिती?

सर्वसामान्यांनाही विमान प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी केंद्र सरकारने उडान योजना आणली. मात्र या योजनेची महाराष्ट्रातील स्थीती काय आहे.

नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या उडान योजनेत अगदी पहिल्या टप्प्यापासून नाशिकचा समावेश झाला खरा, मात्र इतक्या वर्षांनंतरही उडान योजनेचा उद्देश काही पूर्णपणे सफल होऊ शकलेला नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे विस्कळीत आणि बेभरवशाची विमानसेवा..आणि त्याच्या जोडीला विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची अनास्था. सध्या देशात उडान योजनेचा चौथा टप्पा सुरू असतांना नाशिकमध्ये मात्र पहिल्या  टप्प्यातील विमानसेवाही नीटशी सुरू होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत नाशिकहून देशातल्या 6 शहरांसाठी विमानसेवा सुरू असली, तरी ती ही आठवड्यातील ठराविक दिवसचं सुरू असल्यानं नाशिककरांना याचा फारसा फायदा होत नाही

तर तिकडे कोल्हापूरकरांना  या योजनेचा काही प्रमाणात फायदा झालाय. या योजनेमुळे धार्मिक पर्यटनाला मोठा हातभार लागलाय.  विमानसेवा सुरु झाल्यापासून आजपर्यंत कोल्हापुरातल्या 2 लाख 18 हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतलाय. मात्र कोल्हापूर विमानतळावर नाईट लॅंडिंगची सोय नसल्याने याठिकाणी रात्रीची विमानं ये- जा करु शकत नाहीत. या अडचणी दूर होणं गरजेचं आहे.

नाशिक आणि शिर्डीप्रमाणेच उडाण योजनेंतर्गत शिर्डीतूनही विमान वाहतूक सुरू झालीय. मात्र विमानतळावर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. शिवाय टर्मिनल बिल्डींगही नसल्याने प्रवाशांची गैरसोय होतेय. गंभीर बाब म्हणजे विमानतळावर नियमित पाणी पुरवठा होत नाही. शिवाय विमान तळासाठी ज्यांची जमीन संपादीत केली त्यांचंही पुनर्वसन रखडलंय. साई समाधी मंदिरामुळे हे विमानतळ लवकरच आंतरराष्ट्रीय केलं जाणार आहे. मात्र सोयीसुविधांअभावी तूर्तास तरी शिर्डीचा विमानप्रवास जिकरीचाच ठरतोय.

एकूणच राज्यात उडाण योजना अजूनही धावपट्टीवरून पुर्ण क्षमतेने उड्डाण घेऊ शकली नसल्याचंच चित्र आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com