पिंपरीत अंत्यसंस्कारासाठी उकळले जाताहेत साडेआठ हजार रुपये

Crematorium
Crematorium

पिंपरी : कोरोना व्हायरस मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार रुपये वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्मशानभूमीत उघडकीला आला आहे. स्मशानभूमीत पैसे वसूल करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांचा व्हिडीओच साम टीव्हीच्या हाती लागला आहे. Money Extracted from Relatives of Corona Death Victims in Pimpri

कोरोना उपचारामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून स्मशानभूमीतले कर्मचारी मृतदेह दहन करण्यासाठी साडे आठ हजार वसूल करत आहेत. मृतदेह जाळण्यासाठी लागणारे लाकडं आणि गोवऱ्याच्या नावावर स्मशानभूमीतील काही खासगी कर्मचारी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांन कडून साडेआठ हजार रुपये वसूल करत आहेत. 

कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे  रुग्णावर पारंपरिक पद्धतीने अंतीमसंस्कार करण्याची परवानगी आता पिंपरी -  चिंचवड महापालिकेने दिली आहे. कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीच्या दहनासाठी पिंपरी - चिंचवड महापालिकेने  शहरातील सर्व प्रमुख स्मशानभूमीत लाकडं आणि गोवऱ्या अगदी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. Money Extracted from Relatives of Corona Death Victims in Pimpri

तरी देखील काही लोभी कर्मचारी काही खासगी व्यक्तींना हाताशी धरून कोरोना मयत व्यक्तीच्या कुटुंबियां कडून हजारो रुपये वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com