निवडणुकीच्या निकालानंतर कोणी केली खांद्यावर बसून पैशाची उधळपट्टी

निवडणुकीच्या निकालानंतर कोणी केली खांद्यावर बसून पैशाची उधळपट्टी

 निवडणुकीच्या निकालानंतर काढलेल्या मिरवणुकीत एक कार्यकर्ता खांद्यावर बसून पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचा झेंड फडकत असून तो तुळजापूर शहरातील असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांकडून काय भूमिक घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील मोठ्या मताधिक्यानी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी पैशाची उधळपट्टी केल्याचे बोलले जात आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचे झेंडे फडकत असताना दिसत आहेत. कार्यकर्ते हलगीच्या तालावर नाजत पैशे उधळत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार पाटील यांच्या नावाचाही उल्लेख होत असल्याने हा व्हिडीओ तुळजापूर येथील असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पैसे वाटप करणाराही मोठा पदाधिकारी असून पोलिस त्याच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यानी दिली आहे.

webTittle::Money laying on the shoulders in the procession of the worker


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com