Monsoon Update: पुढील 24 तासात केरळात होणार मान्सूनचे आगमन 

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

चक्रीय वाऱ्याची स्थिती अरबी समुद्राचा पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान निर्माण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेतचं ठाण मांडून बसले होते. पण आता  पोषक हवामानाची स्थिती मान्सूनच्या आगमनासाठी निर्माण झाली आहे.

मुंबई: चक्रीय वाऱ्याची Cyclonic wind स्थिती अरबी समुद्राचा Arabian Sea पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक Karnatak किनारपट्टीच्या दरम्यान निर्माण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे Southwest monsoon winds श्रीलंकेतचं Shrilanka ठाण मांडून बसले होते. पण आता  पोषक हवामानाची स्थिती मान्सूनच्या Monsoon आगमनासाठी निर्माण झाली आहे. Monsoon will arrive in Kerala in 24 hours

त्यामुळे केरळात Kerala मान्सून पुढील 24 तासांत दाखल होणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून Indian Meteorological Department वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक अनुकुल बदल झाल्यामुळे केरळात ढगाळ वातावरण निर्माण  झालं आहे.

एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला... ( पहा व्हिडिओ )

दुसरीकडे, महाराष्ट्राला Maharashtra अवकाळी पावसाचा तडाखा मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट आहे. आज दुपारपासूनचं पुणे, जालना, रत्नागिरी, औरंगाबाद, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे  हवामान खात्याकडून याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा देशात मान्सून बरसणार 101 टक्के

मंगळवारी हवामान खात्याने दुसरा सुधारित मान्सूनचा अंदाज जारी केला. यानुसार जून ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरी 101 टक्के पावसाची शक्यता आहे. यंदा कोकणात सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता या नवीन सुधारित अंदाजानुसार आहे. तर  हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे कि मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार आहे. यावर्षी देशात केवळ 8 टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live