पुन्हा  इस्त्रो घेणार चंद्रभरारी… 

पुन्हा  इस्त्रो घेणार चंद्रभरारी… 

 एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील १४ दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-२ मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एयरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इस्त्रो आणि जाक्साचे वैज्ञानिक चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित मोहिम राबवण्याचा विचार करत आहेत.’

चांद्रयान-२ मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत. लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या २.१ कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.

बंगळुरुमध्ये झालेल्या दोन्ही देशांच्या अवकाश संशोधन संस्थांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली होती. तसेच २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले होते त्यावेळेसही या मोहिमेसंदर्भात चर्चा झाली होती.२०२४ मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत २०२२ ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा २०१७ साली झाली होती. 

याच वर्षी जपानच्या ‘जाक्सा’ने एका बटुग्रहावर यशस्वीपणे हायाबुसा-२ हे यान उतरवले. या मोहिमेच्या माध्यमातून जपानने अंतराळ क्षेत्रातील आपले तांत्रिक वर्चस्व सिद्ध केले आहे.


Web Title:Moon will again be held at Estro…
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com