जगभरात 10 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनाने मृत्यू, चीनपेक्षा इटलीत सर्वाधिक बळी

किरण कुटाळे
शुक्रवार, 20 मार्च 2020

जगभरात आतापर्यंत  2 लाख 39 हजार 877 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा जगभरातील 10 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

इटली - कोरोनामुळे आतापर्यंत सगळ्यात जास्त मृत्यू चीनमध्ये झाले होते. मात्र आता इटलीने मृतांच्या आकडेवारील चीनला मागे टाकलंय. इटली मध्ये आतापर्यंत 3 हजार 405 जणांचा मृत्यू झालाय. तर चीनमध्ये 3 हजार 248 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी 24 तासांत 475 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

 

दरम्यान, जगभरात आतापर्यंत  2 लाख 39 हजार 877 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा जगभरातील 10 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा जगभरातील मृतांची संख्या जवळपास 10हजारपेक्षा जास्त झाल्याची माहिती समोर आली आहे. 10 हजार 20 जणांचा मृत्यू आतापर्यंत कोरोनामुळे  झाला आहे.

 

स्पेन आणि अमेरिकेतील मृतांचा आकडाही वेगानं वाढतो आहे. स्पेनमध्ये 833 तर अमेरिकेतमध्ये 205 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

 

अवघ्या जगाला चिंतेत लोटणाऱ्या कोरोना व्हायरसच्या आजारावर मलेरियाचं औषध प्रभावी ठरल्याचं अमेरिकेत दिसून आलंय..अमेरिकेत मलेरियाच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर गुणकारी ठरत असल्याचं दिसून आलंय, असा दावा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. 

 

कुठे किती जणांचा मृत्यू? पाहा TWEET

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

हेही वाचा - अमेरिकेत सापडलं कोरोनावर औषध?

हेही वाचा - सामान्य शंकेसाठी लगेच डॉक्टरकडे जाण्याचा मोह टाळावा, असं मोदी म्हणत आहेत

हेही वाचा - आजपासून या गोष्टीही बंद राहणार आहेत 

corona virus death toll increasing 10 thousand people dead due to corona

 

more than 10 thousand people died due to covid 19 corona virus marathi

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live