पावसाळ्यापूर्वी २७ गावातील नालेसफाई पूर्ण करा, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईरांचे निवेदन

साम टीव्ही ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरांसह महापालिका क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या २७ गावातील देखील नालेसफाई करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात नगरसेवक आणि  उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन नालेसफाईबाबत निवेदन दिले आहे. 

कल्याण :  कल्याण डोंबिवली Kalyan Dombivali महापालिका क्षेत्रामधील नाले Gutter सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरांसह महापालिका क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या २७ गावातील देखील नालेसफाई करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात नगरसेवक आणि उपमहापौर मोरेश्वर भोईर Moreshwar Bhoir यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे Kalyan Dombivali Municipal Corporation आयुक्त विजय सूर्यवंशी Vijay Surywanshi यांची भेट घेऊन नालेसफाईबाबत निवेदन दिले आहे. Moreshwar Bhoir has demanded immediate cleaning gutters in Kalyan dombivali region 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये झपाट्याने नागरीकरण Civilization होत आहे. मात्र असे असताना या गावांना आवश्यक अश्या योजनांचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे या गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे रस्ते देखील तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. 

हे देखील पहा -

तर सध्या पावसाळयात Monsoon निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला कारणीभूत असलेल्या गटारांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने अत्यंत जलदगतीने नालेसफाईला  सुरुवात केली असून, ३१ मे  पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे लक्ष महापालिकेने समोर ठेवले आहे. मात्र असे असताना २७ गावातील नाले मात्र तुडुंब भरले आहेत. त्यांची देखील तातडीने सफाई करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. Moreshwar Bhoir has demanded immediate cleaning gutters in Kalyan dombivali region 

कोरोना व्हॅक्सिनच्या तुटवड्यावर नितीन गडकरी यांचा मोठा सल्ला म्हणाले...

तसेच भोईर यांनी  कोरोना Corona महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन २७ गावांत देखील भौगोलिक रचने प्रमाणे विविध ठिकाणी कोवीड लसीकरण Covid Vaccination केंद्र सुरु करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच २७ गावांत देखील कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले .

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live