शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू

विनोद जिरे
रविवार, 23 मे 2021

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या, किट्टीआडगाव परिसरात उघडकीस आली आहे

बीड : शॉर्टसर्किटने Short Circuit लागलेल्या आगीत Fire मायलेकींचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बीडच्या Beed माजलगाव तालुक्यात असणाऱ्या, किट्टीआडगाव परिसरात उघडकीस आली आहे. Mother and Daughter Died in Fire at Beed

शशिकला शंकरराव फफाळ वय 65 व सखुबाई शंकरराव फफाळ वय 45 अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. शशिकला आणि सखुबाई या मायलेकी घरात झोपल्या होत्या. या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटने घराला आग लागली आणि या दोघींचाही होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.तर घराला नेमकी कशामुळे लागली? याचा तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  Mother and Daughter Died in Fire at Beed
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live