रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे : खरेदी करुन रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले. या अपघातात आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता कोथरुड येथील पौड रस्त्यावर घडली.  याप्रकरणी सोनल मनेर (वय 38, रा. पाषाण) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणेर या त्यांच्या दोन मुली मेहक (वय 10) व मायरा (वय 6) यांच्यासह शनिवारी पौड रस्त्यावरील एका दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.

पुणे : खरेदी करुन रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीने मायलेकींना उडविले. या अपघातात आईसह दोन्ही मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता कोथरुड येथील पौड रस्त्यावर घडली.  याप्रकरणी सोनल मनेर (वय 38, रा. पाषाण) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणेर या त्यांच्या दोन मुली मेहक (वय 10) व मायरा (वय 6) यांच्यासह शनिवारी पौड रस्त्यावरील एका दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या दोन्ही मुलींसमवेत दुर्गा कॅफेसमोरील रस्ता ओलांडून पलिकडे लावलेल्या त्यांच्या गाडीकडे जात होत्या. तेवढ्यात आनंदनगरच्या दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने तिघींना उडविले. मेहक व मायरा या दोन्ही मुलींसह मनेर यांच्या डोक्‍याला, खांद्याला जबर मार बसला. या
घटनेनंतर नागरिकांनी तिघींनाही उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.

दरम्यान, अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन त्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी राजेंद्र चव्हाण करत आहेत. 
 

Web Title: mother and daughter hit by two wheeler in pune


संबंधित बातम्या

Saam TV Live