धक्कादायक घटना! धावत्या एक्सप्रेससमोर आईनं ५ मुलींसह उडी मारून केली आत्महत्या... 

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

छत्तीसगडच्या  महासमुंद ठिकाणी एका महिलेने आपल्या ५ मुलींसह रात्री ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सर्वांचे मृतदेह सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर किळसवानी अवस्थेत आढलले.

छत्तीसगड : छत्तीसगडच्या Chhattisgarh महासमुंद Mahasamund ठिकाणी एका महिलेने आपल्या ५ मुलींसह रात्री ट्रेन Train समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सर्वांचे मृतदेह सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर किळसवानी अवस्थेत आढलले. मृतांमधील Dead सर्व मुलींचे वय १० ते १८ या वयोगटातील आहे. तळीराम नवऱ्यासोबत वारंवार वाद- विवाद होत असल्याच्या कारणावरून महिलेने हे धक्कादायक पाऊलं उचचलं आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले होते. Mother commits suicide by jumping in front of a running express with 5 daughters

सायंकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा, पत्नी उमा आणि त्याच्यात मोठे भांडण झाले. हा वाद आणखी वाढत गेल्यामुळे उमा सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या पाच मुली त्यात अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुलसीला यांना घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर या सर्वांचा ठावठिकाणा लागत नव्हता. रात्री ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेततळे ठरले मृत्यूचे जाळे; बाप-लेकासह भाच्याच्या बुडून मृत्यू 

माहितीनुसार, इमलीभांठा Imlibhatha नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले बघितले. त्यानंतर ही माहिती कोतवाली Kotwali पोलीस स्टेशनला सांगितली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळ या ठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. बेमचा येथील ४५ वर्षीय रहिवासी उमा साहू आणि तिचा नवरा केजराम यांच्यात अनेकदा वादविवाद होत असत. Mother commits suicide by jumping in front of a running express with 5 daughters 

हे देखील पहा 

केजराम याला दारूचं व्यसन होते. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा ही घटना घडली आहे. महिला आणि ३ मुलींचा मृतदेह काही अंतरावर सापडले तर, अन्य दोन मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडले होते. मृतदेहासोबत त्यांच्या चप्पलाही पडल्या होते. आसपासच्या लोकांची चौकशी केली असता, मृतदेहाची ओळख पटली आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live