आई- वडिलांनी मुलीचा हात हातात घेत तापी पुलावरून उडी मारत संपवली जीवन यात्रा

भूषण अहिरे
बुधवार, 19 मे 2021

शिरपूर तालुक्यातील सावळदे परिसरात असलेल्या तापी नदीच्या पुलावरून एकाच कुटुंबातील तिघा माय लेकांनी उडी घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुलावर चार चाकी कार उभी असल्याने घटनेचा उलगडा झाला असून, ठाणे पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धुळे:  शिरपूर Shirpur तालुक्यातील सावळदे परिसरात असलेल्या तापी नदीच्या Tapi River पुलावरून एकाच कुटुंबातील तिघामाय बाप आणि लेकीने उडी मारून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुलावर चार चाकी कार उभी असल्याने घटनेचा उलगडा झाला. ठाणे पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या आकस्मात मृत्यूची Accidental death नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्या करण्या मागचं या कुटुंबीयांचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ  व्यक्त केली जात आहे. Mother father and daughter jumped off the Tapi bridge and ended their life

शिरपूर तालुक्यातील सावळदे जवळ तापी नदीच्या पुलावरून उडी घेत जळगांव जिल्ह्यातील भोद येथील एका कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र देसले (वय ५४), पत्नी वंदनाबाई देसले (वय ४८) आणि मुलगी ज्ञानल (वय २१) असे तिघे राहणार भोद ता. धरणगाव जि. जळगांव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तींचे नाव आहेत.

हे देखील पहा -

रात्री सावळदे जवळ तापी नदी पुलावर (एम एच १९ पीए १०९४) क्रमांकाची इंडिका कार संशयित रित्या उभी असल्याची आढळून आली.  नागरिकांनी थाळनेर पोलीसांना , शिरपूर शहर व नरडाणा पोलीस ठाण्यात खबर दिल्याने तिन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होते अधिक तपास केला असता तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करीत शोध घेतला जात होता. Mother father and daughter jumped off the Tapi bridge and ended their life

दरम्यान तिघांचे मृतदेह Dead Body नदी पात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यांचा मृतदेह थाळनेर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आमदार श्रीनिवास वनगा यांनी मच्छीमारांना दिला मदतीचा हात

हे तिघेही जण अमळनेर Alamner तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्ताने आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी १७ मे रोजी घरी जाण्यासाठी निघाले परंतु त्यांनी धरणगावकडे जाण्याचा रस्ता सोडून उलट्या दिशेने प्रवास करीत तापी नदीच्या पुलावर गाडी थांबवून त्यांनी आत्महत्या केली. 

राजेंद्र रायभान देसले हे धरणगाव- एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे BJP तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एवढ्या राजकीय वलय असलेल्या पुढाऱ्यांने पत्नी व मुलगीसह आत्महत्या केल्याने खान्देशासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

Edited By- Sanika Gade
  


संबंधित बातम्या

Saam TV Live