संघर्षाशी दोन हात करत मुकबाधिर मुलांचा सांभाळ करतीय ही आई

अन्नपूर्णाबाई
अन्नपूर्णाबाई

हिंगोली - आपण अनेकांनी आईच्या प्रेमाचे Mother Love किस्से ऐकले असतील अनुभवले ही असतील.  हे सगळं करताना आईच्या प्रेमाचा पाझर हा कधीच आटलेला नसतो. परंतु  हिंगोलीत Hingoli गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या पोटी जन्माला आलेल्या दोन मूकबधिर मुलांना Deaf and dumb children गेल्या पंचवीस वर्षापासून काबाडकष्ट करत आहे. स्वाभिमानाने self respect जगविनाऱ्या आईने Mother परिस्थिती समोर हात टेकून माझ्या जिवंतपणी मुलांना मदत करा अशी समाजातील दानशूरांना मदत मागितली आहे. This mother is taking care of deaf and dumb children with both hands

अन्नपूर्णाबाई धुळे या 58 वर्षांच्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात आदिवासी पाड्यातील पिंपळदरी गावात अन्नपूर्णाबाईं राहतात. घरी अठराविश्व दारिद्र्य आणि  गरिबी अन्नपूर्णाबाईंच्या पाचवीला पुजलेली, लहानपणापासून संघर्ष करणाऱ्या अन्नपूर्णाबाई मागील चार दशकांपूर्वीच विवाहबद्ध झाल्या होत्या. 

हे देखील पहा - 

अन्नपूर्णाबाईना दोन मुळे आहेत. परंतु ही दोन्ही मुले मूकबधिर म्हणून जन्माला आली आहेत.  देविदास व राहुल अशी त्यांची नावे आहेत. ही मुले जशी मोठी 
झाली तसं अन्नपूर्णाबाईच्या आयुष्यातील दुसरा संघर्षमय प्रवास सुरू झाला. मुकबाधिर मुळे झाल्यामुळे अन्नपूर्णाबाई यांच्या पतीने  त्यांना सोडून दिली.  परंतु त्यांनी आपल्या मुलांची साथ सोडली नाही. कायम संघर्षाची दोन हात करत अन्नपूर्णाबाईंनी गेल्या 27 वर्षापासून पिंपळदरी गावात हाताला मिळेल ते काम करत होत्या. सर्व कामे करून त्यांनी राहुल व देविदास यांचा सांभाळ करत त्यांना मोठ केलं. दोन्ही मुलांना मोठं करताना अन्नपूर्णबाईंनी , लोकांची धुणी भांडी शेतातील कामे तसेच पुरुषांची या सर्व कामामधून मिळणारे पैसे त्यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी तसेच संगोपनासाठी वापरले.  परंतु आता या माऊलीने परिस्थितीसमोर हात टेकले आहेत.  याचे मुख्य कारण म्हणजे अन्नपूर्णाबाईंचा सुरू झालेला वृद्धापकाळ आणि कोरोनाचे संकट आहे असे अन्नपूर्णाबाई यांनी माहिती दिली आहे. 

जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे.  अनेकांनी  या महामारीत आपले प्राण गमावले आहेत.  त्यामुळे आपला देखील जीव गेला तर राहुल आणि देविदास सांभाळ कोण करेल अशी चिंता अन्नपूर्णाबाईना करत आहे. मुलांचं संगोपन करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अन्नपूर्णाबाईनी अनेक पाहुणे मंडळीकडे मदतीची मागणी केली. परंतु त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी त्यांना मदत केली नसल्याचं अन्नपूर्णाबाई यांनी सांगितले आहे. सध्या माझ्यावर जी दुर्दैवी वेळ आली ती इतर कुणावर असती तर मी नक्कीच माझ्या कष्टाने खारीचा वाटा उचलला असता असे, अन्नपूर्णाबाई स्वाभीमानाने म्हंटले आहे. 

गेल्या अनेक दशकांपासून अन्नपूर्णाबाईंनी स्वाभिमानाने आपल्या मुलांचे संगोपन केले आहे. त्यांनी कोणासमोरही हात पसरले नाहीत. परंतु परिस्थितीने त्यांच्यावर ही दुर्दैवी वेळ आल्याचं गावातील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी माहिती दिली आहे. ग्रामपंचायत कार्यालयपिंपळदरीच्या वतीने अन्नपूर्णाबाईना अनेक योजनांमधून शक्य तितके आर्थिक मदत देण्यात आलेले आहे.

पिंपळदरी गावातील युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील निधी उभा करून अन्नपूर्णाबाई दिला आहे. पिंपळदरी गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी देखील अन्नपूर्णबाईंना शक्यतितकी मदत करत आहेत. त्याना व त्यांच्या मुलांना रुग्णालयातील सोई सुविधा तातडीने उपलब्ध होतात. अनेक दशकांपासून संघर्षाची दोन हात करणाऱ्या या माउलीला आता समाजातील दानशूर मंडळींनी मदत करण्याची खरी गरज आहे, आपल्या प्रत्येकाने  खारीचा वाटा दिला तर या माऊलीच्या गेल्या अनेक दशकांपासूनच्या संघर्षाला नक्कीच बळ मिळेल. 

Edited By - Puja Bonkile 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com