जेव्हा एक अपंग आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते...वाचा या मातेची अंगावर काटा आणणारी गोष्ट

साम टीव्ही
शुक्रवार, 1 मे 2020

आता बातमी हिरकणी बनलेल्या एका आईची... लॉकडाऊनच्या काळात एका आईनं पोटच्या गोळ्याला भेटण्यासाठी जे केलंय ते बघून तुमच्या अंगावर काटा येईल आणि आईच्या मायेची महतीही तुम्हाला कळेल... पाहूयात पुण्यातील हिरकणीची गोष्ट..

आता बातमी हिरकणी बनलेल्या एका आईची... लॉकडाऊनच्या काळात एका आईनं पोटच्या गोळ्याला भेटण्यासाठी जे केलंय ते बघून तुमच्या अंगावर काटा येईल आणि आईच्या मायेची महतीही तुम्हाला कळेल... पाहूयात पुण्यातील हिरकणीची गोष्ट..

1400 किलोमीटर... 3 दिवस आणि 54 तास.... हे काऊंटडाऊन कोणत्या स्पर्धेचं नाहीय. किंवा हा कोणत्याही मॅरेथॉ़नचा टास्क नाहीय. तर हा आहे एका काळजाचा प्रवास... एका जिद्दी मायेचा प्रवास... पोटच्या गोळ्यासाठी व्याकूळ झालेल्या आईचा प्रवास... पुण्यातील भोसरी येथील एका अपंग मातेचा प्रवास...  सोनू गिरधारी यांनी हा प्रवास केलाय... जीवावर उदार होऊन... पोटच्या पोरासाठी... प्रतिकसाठी... त्याचं झालं असं की, त्यांचा मुलगा अमरावतीला गेला आणि लॉकडाऊनचा फेरा फिरला... जगाची चाकं थांबली, प्रत्येक जण थबकला... मुलगा प्रतिक आणि आई सोनू यांची ताटातूट झाली... पोराच्या विरहाने त्या कोसळून गेल्या... रात-रातभर डोळ्याला डोळा लागेना... आईचं काळीजच ते... त्यांनी थेट पोलिसांना गाक दिली...पोटच्या गोळ्यासाठी कासावीस झालेल्या आईचं मन पोलिसांनी जाणलं... काही अटी घालून अमरावतीला जाण्याची परवानगी मिळाली...

पोलिसांनी परवानगी दिली... मात्र खरं युद्ध आता सुरू होणार होतं... कारण पोलिसांनी पुणे-ते अमरावती असा परतीचा प्रवास करण्यासाठी मुदत दिली होती अवघ्या तीन दिवसांची... रस्ते बंद, गाड्या बंद... अशा अवस्थेत अमरावतीला जायचं कसं... असंख्य प्रश्नांचं भूत आजूबाजूला होतं... पण सोनू खंदारे डगमगल्या नाहीत. त्यांनी दुचाकी काढली आणि प्रवास सुरू केला... रस्त्याने संकटांचे खड्डे पदोपदी होतेच... कधी पेट्रोल संपणं... कधी गाडी पंक्चर होणं तर कधी पेट्रोलपंपावर मुक्काम करणं... असं करत त्या निघाल्या अमरावतीच्या दिशेनं... पोटच्या लेकराच्या दिशेनं...

एवढी दिव्य पार करून सोनू खंदारे शेवटी लेकराजवळ पोहोचल्याच... पोटच्या पोराला कुशीत घेतलं तेव्हाच त्यांचं मन शांत झालं... पोटच्या पोराला परत घेऊन सोनू पुण्यात पुन्हा आल्या... अवघ्या 54 तासांत... या लॉकडाऊनच्या काळात 1400 किलोमीटरचा प्रवास, चक्क दुचाकीवरून... तेही एका अपंग महिलेचा... अंगावर काटा उभा राहिल असा हा प्रवास सोनू खंदारेंनी पार केलाय. लेकराला कुशीत घेण्यासाठी जीवघेणा घाट उतरणारी हिरकणी आपण इतिहासात पाहिलीय... एका पिलासाठी जीव झाडाला टांगणारी आई आपल्याला बहिणाबाईंनी दाखवलीय... आईच्या मायेचा महिमा काय सांगावा... आभाळाएवढा पदर असलेली आई पोरासाठी काय काय करू शकते हेच सोनू खंदारे यांच्या या प्रवासातून दिसलंय. खरंच... आई ही आई असते...


संबंधित बातम्या

Saam TV Live