मोटरमनच्या प्रसंगावधनाने वाचला वृद्धाचा जीव

अजय दुधाणे
रविवार, 6 जून 2021

मोटरमनने दाखवलेल्या  प्रसंगावधनामुळे एका चालत्या लोकल खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या एका वृद्ध इसमाचा जीव वाचल्याची घटना काल विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली.

वृत्तसंस्था : मोटरमनने दाखवलेल्या  प्रसंगावधनामुळे एका चालत्या लोकल खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या एका वृद्ध इसमाचा जीव वाचल्याची घटना काल विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय आजारपणाला कंटाळून कुटुंबावर आपला भार नको म्हणून आत्महत्येच्या हेतूने घराबाहेर पडलेली 79 वर्षीय व्यक्ती काल दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पोहचला होता. (The motorman saved the life of an elderly man who was contemplating suicide) 

बदलापूर लोकल येताना पाहून पाहून  त्याने रुळावर धाव घेतली मात्र मोटरमन ने प्रसंगावधान राखत वेळीच अत्यावश्यक ब्रेक दाबून  ट्रेन थांबवली. रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार खंडू व्हटकर आणि महिला पोलीस कर्मचारी गोंधळे यांनी तत्काळ या वृद्धाला रेल्वे ट्रक मधून बाहेर काढत त्याची समजूत काढली.  त्यानंतर  त्याच्या मुलाशी संपर्क साधत त्याच्या हवाली केले . या घटनेनंतर प्रसंगावधान राखणाऱ्या राजन सी आर या मोटरमनचे कौतुक होत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live