"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच!

"त्या' बहीण-भावाचा मृत्यू नैसर्गिकच!

नागपूर - तात्या टोपेनगरात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मोटवानी "बहीण-भावाचा' मृत्यू नैसर्गिकच असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले. शवविच्छेदनानंतर दोघेही बहीण-भावाचा मृतदेह मेडिकलमध्ये ठेवण्यात आला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप एकही नातेवाईक समोर आला नाही. 

मोहनलाल रांजोमल मोटवानी (वय 85) आणि त्यांची बहीण शांता कौर (82) यांचा मंगळवारी दुपारी तात्या टोपेनगरातील वडिलोपार्जित घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे ही घटना उघडकीस आली होती. बजाजनगर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह मेडिकलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविले होते. तसेच त्यांच्या घरातून सापडलेल्या मोबाईलमधून नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईलमध्ये दुधवाला, भाजीवाला, पोलिस, पेपरवाला, फार्मासिस्ट आणि मॅकेनिक असेच मोबाईल क्रमांक आढळून आले. मोबाईलमध्ये एकाही नातेवाइकाचा मोबाईल क्रमांक मिळून आला नाही. 

शेजाऱ्यांशी वाद नडला 
मोटवानी यांचे शेजाऱ्यांशी फारसे पटत नव्हते. सामाजिक-धार्मिक कार्यात सहभागी होत नव्हते. त्यांच्या घरात टीव्ही, फ्रीज, कूलरसुद्धा नव्हता. कंजूष असल्यामुळे कुणी वर्गणी मागायलाही जात नव्हते. शेजाऱ्यांसोबत नेहमी वाद करीत असल्यामुळे शेजारी दोन हात लांब राहत होते. 

मोटवानींच्या घरावर डोळा 
स्वतःला तथाकथित सामाजिक कार्यकर्ता समजणाऱ्या काही पांढरपेशांनी मोटवानी यांच्या घरावर डोळा ठेवला आहे. मोटवानी यांना कुणीही नातेवाईक नसल्यामुळे एका पांढरपेशाने स्वतःच मोबाईलवर मॅसेज तसेच पत्रक काढून मोटवानीच्या प्रॉपर्टीबाबत बोलायचे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावरून मोटवानी यांची प्रॉपर्टी हडपण्याचा कट शिजून तयार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Motwani Sister & brother death natural

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com