VIDEO | विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी वंचित बहुजन आघाडीचं आक्रमक आंदोलन

साम टीव्ही
सोमवार, 31 ऑगस्ट 2020
  • वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात दाखल
  • विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी वंचितचं आंदोलन
  • शिवाजी चौकात कार्यकर्ते जमा होण्यास सुरूवात
  • विठ्ठल मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद

नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतारलीय. त्यामुळं राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिरांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी द्यावी असं मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. दरम्यान वंचितचं पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रवेश आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात दाखल होऊ लागलेत. पोलिसांनी विठ्ठल मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केलेत. शिवाजी चौकात कार्यकर्ते जमा होऊ लागले आहेत. मुंबई, मराठवाडा, विदर्भातून कार्यकर्ते दाखल झालेत. पंढरपुरात राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी ही दाखल झालीय. विठ्ठल मंदिर आणि परिसराला छावणीच स्वरूप आलंय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आंदोलना दरम्यान शहरात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आलाय. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी एक तुकडी आता मंदिर परिसरात दाखल झालीय. आज सकाळ पासूनच शहर आणि मंदिर परिसरात 400 पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलाय.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी सोलापूर विभागाने आज पंढरपुरातून होणारी एसटीची प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. पंढरपूर आगारातून आणि बाहेरच्या आगारातील सुमारे 55 फेर्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय देखील होणार आहे. 

त्यामुळे सरकारने किती ही पोलीस फौज फाटा उभा केला आणि मंदिरात प्रवेश जरी नाही दिला तरी वंचितचं आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार आहे. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरमध्ये व्यक्त केलंय. 

दरम्यान, पंढरपुरात वंचितचं आंदोलन सुरू झालंय. प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल झालेत. वंचितच्या या आंदोलनात प्रचंड मोठी गर्दी झालीय. यावेळी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळालाय.  मंदिर उघडण्यासाठी वंचित रस्त्यावर उतरलीय. मंदिर प्रवेशावर आपण ठाम असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. त्यामुळे आता पंढरपुरात तणावाचं वातावरण आहे.

आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मंदिराला कुणीही आनंदाने टाळं लावत नाही. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे ठाकरे सरकार काही गोष्टी टप्प्या टप्प्यानं सुरू करतंय. कायदा समजणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी कायदेभंग करून लोकांना उचकावण्याचा प्रयत्न करू नये. अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावलाय. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणं योग्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकांना वेठीस धरू नये. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून तोडगाव काढावा असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय. अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतलाय. 

VIDEO | ठाकरेंचा महाराष्ट्र व्हेंटिलेटरवर, वाचा प्रशासनाचा अक्षम्य गलथान कारभार

पाहा सविस्तर व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live