शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप स्थगित  

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप स्थगित  

नाशिक - शासकीय, निमशासकीय व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवार (ता. 11) पासून पुकारलेला बेमुदत संप स्थगित केला आहे. बुधवारी (ता. 11) शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर शुक्रवार (ता. 13) पासून बेमुदत संप करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

1 नोव्हेंबर 2015 नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या शासकीय, निमशासकीय व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारला होता. सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर व्हाव्यात, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयांत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावरून चर्चा केली जाणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.


Web Title: Movement of non-teaching staff agitation temporarily halted

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com