अमरावतीत धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

ग्रामीण भागातून अमरावती शहरात उपचारासाठी रुग्ण घेऊन येत असलेल्या रुग्णवाहीकेला शॉट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली

अमरावती : ग्रामीण Rural भागातून अमरावती Amravati शहरात उपचारासाठी रुग्ण घेऊन येत असलेल्या रुग्णवाहीकेला शॉट सर्किटमुळे आग लागल्याने या आगीत रुग्णवाहिका Ambulance जळून खाक झाल्याची घटना सकाळी 12 वाजता च्या सुमारास अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख Dr. Punjabrao Deshmukh वैद्यकीय महाविद्यालया जवळ घडली आहे, यामध्ये चालकाच्या सतर्कतेमुळे एका रुग्णांचा जीव वाचला आहे. A moving ambulance caught fire in Amravati

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांच्या श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थाची ही रुग्णवाहिका अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लेहगाव Lehgaon येथून एक रुग्ण घेऊन अमरावती शहरात येत होता. मात्र, अचानक धावत्या रुग्णवाहिकेला समोरच्या भागाला आग लागली. चालकाला जळल्याचा वास येताच  त्याने तात्काळ क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका थांबून यातील रुग्णाला खाली उतरून त्याला सुखरूप बाहेर काढले. 

त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,यामध्ये रुग्णवाहिकाचे चालक विक्की तंतरपाळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही आग विझविण्यासाठी शहर वाहतूक पोलीस Police तसेच युवक काँग्रेसचे Congress मोर्शी अध्यक्ष पवन काळमेघ यांच्या सह कार्यकर्त्यांनी ही आग विझविण्यासाठी मदत कार्य केली. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live