ज्योतिरादित्य यांची धुळवड जोरात, मध्य प्रदेशातल्या राजकीय नाट्याची A टू Z कहाणी

विशाल सवणे
मंगळवार, 10 मार्च 2020

ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाआधी एका त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेऊयात. ज्योतिरादित्य सिंधिया कांग्रेससाठी महत्त्वाचं नाव का होतं, ते एकदा पाहुयात..

मध्य प्रदेशात राजकीय धुळवडीची चर्चा सध्या तुफान रंगली आहे. गेल्या आठवड्याभरापासून या सगळ्याचे संकेत मिळत होते. अखेर याला सोमवारपासून चांगलाच वेग आला. नेमकं कालपासून मध्य प्रदेशच्या राजकारणात काय काय घडामोडी घडल्यात, त्याची A टू Z खबरबात घेणार आहोत. 
 

काल रात्रीपासून काय काय घडलं?

1) कमलनाथ सरकारमधील 22 मंत्र्यांनी राजीनामे दिले. सोमवारी रात्री उशिरा राजीनामे देण्यात आले. महाराष्ट्राप्रमाणेच रात्रीच्या वेळी राजकीट घडामोडींना महाराष्ट्रातही वेग आल्याचं पाहायला मिळालं. 

2) शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली.

3) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर शिवराज सिंह चौहान गृहमंत्री अमित शहा यांची भेटीला गेली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांची अमित शहांसोबत तब्बल 2 तास प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं असेल, याची कोणतीही माहिती कळू शकली नाही. 

4) आज सकाळपासून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीच्या वृत्तानं एकच खळबळ उडाली. ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना ऊत आला होता. अशातच ज्योतिरादित्य सिंधिया दिल्ली अमित शहांच्या भेटीला गेले. यामुळे राजकीय तर्क अधिकच लढवले जाऊ लागले. 

5) शहांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले. तासभर मोदींशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. यावेळी अमित शहादेखील हजर होते. यावेळी भाजपात ज्योतिरादित्य सिंधिया प्रवेश करणार असल्याचं वृत्ताला दुजोरा दिला जात होता.

6) तोपर्यंत इकडे मध्यप्रदेशचे भाजपचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे भोपाळमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली. 

7) या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणी वाढतच होत्या. अशातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथयांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

8) दरम्यानच्या काळात शिवराजसिंह चौहान यांची प्रतिक्रिया समोर आली. हा सगळा काँग्रेसचा अंतर्गत वाद असून आमचा काही संबंध नाही, असं चौहान यांनी माध्यमांशी बोलतना सांगितलं. 

9) शिवराजसिंहांच्या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही क्षणांत ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनाम्याचं वृत्त समोर आलं. त्याबाबतचं पत्रदेखील समोर आलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खरंतर काल ( 9 March)लाच राजीनामा दिल्याचं समोर आलं. या पत्रात 9 मार्चचा उल्लेख होता. याचा अर्थ राजीनामा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कालच दिला होता, असं समोर आलं. 

10) या सगळ्यात काँग्रेसने मात्र वेगळाच दावा केला. पक्षविरोधी कारवायांमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांची हकालपट्टी केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. सोनिया गांधी यांनीही ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजीनामा स्वीकारल्याचं समोर आलं. 

 

हेही वाचा - 'महाराजांनी' असं कोसळवलं, कमलनाथ यांचं सरकार

हेही वाचा - ज्योतिरादित्यांचा राजीनामा आणि काँग्रेसची माधवराव शिंदेंना आदरांजली

 

आता ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाआधी एका त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेऊयात. ज्योतिरादित्य सिंधिया कांग्रेससाठी महत्त्वाचं नाव का होतं, ते एकदा पाहुयात..

कोण आहेत ज्योतिरादित्य सिंधिया?

  • 01) ज्योतिरादित्य सिंधिया यांचं मूळचं घराणं महाराष्ट्रातलं. मध्य प्रदेशात गेल्यामुळे शिंदे आडनावाचा उच्चार सिंधिया असा झाला. 
  • 02) ज्योतिरादित्य सिंधिया हे  राजघराण्यातील एकमेव वारसदार आहेत. 
  • 03) स्वर्गिय माधवराव सिंधिया यांचे ज्योतिरादित्य हे पुत्र आहेत.
  • 04) काँग्रेस पक्षातील युवा नेता अशी ज्योतिरादित्य यांची ओळख होती.
  • 05) राहुल गांधी यांच्या एकदम जवळचे आणि  विश्वासातील नेते 
  • 06)देहरादूनच्या प्रसिद्ध दून शाळेतून शिक्षण घेतलं.
  • 07) स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूल मधून त्यांनी पुढील शिक्षण घेतलं.
  • 08) साडेसात वर्ष अमेरिकेत राहिले. तिथेच त्यांनी नोकरी केली.
  • 09) ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं
  • 10) वडिलांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य सिंधिया राजकारणात सक्रिय झालेत. 

हेही पाहा - 

mp jyotiraditya shinde madhya pradesh politics a to z story bjp congress amit shah narendra modi sonia gandhi priyanka gandhi kamalnath shivraj jyotiraditya scindia


संबंधित बातम्या

Saam TV Live