खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी

rahul shewale
rahul shewale

मुंबई - कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Maharashtraआढळणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना 'महात्मा फुले जन आरोग्य योजना'  Mahatma Phule Jan Arogya Yojana आणि 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' Ayushyaman Bharat Jan Arogya Yojana या योजनांच्या माध्यमातून मोफत कोरोना उपचार द्यावा, अशी  मागणी खासदार राहुल शेवाळे Rahul Shewale यांनी मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.  MP Rahul Shewale's written demand to the Chief Minister

खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, गेल्या वर्षभरापासून माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते.

हे देखील पहा -

मात्र यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीय रहिवासी सोसायटी, इमारतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीला लागण झाली की अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढते आहे. सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण असल्याने मध्यमवर्गीय रुग्णांना परिसरातील नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागते. MP Rahul Shewale's written demand to the Chief Minister

एका कोरोना रुग्णाचे दहा दिवसांचे कमीत कमी बील साधारण दीड ते दोन लाख रुपये होते. त्यातच घरातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित झाल्यास हा आकडा कमीतकमी दहा लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मध्यमवर्गीय  कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडतो. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या रुग्णांचा 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' किंवा 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' या योजनांमध्ये समावेश करून त्यांना मोफत कोरोना उपचार दिल्यास राज्यातील मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com