गजानन मारणे याला मदत केल्या प्रकरणी संजय काकडे यांना अटक

sanjay kakade
sanjay kakade

पुणे : माजी खासदार संजय काकडे Sanjay Kakade यांना पुणे Pune पोलिसांनी Police गजानन मारणे Gajanan Marne रॅली प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधात अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई Mumbai-पुणे एक्स्प्रेसवे वर शेकडो कारचा सहभाग असलेली रॅली काढली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता Amitabh Gupta यांनी ही माहिती दिली आहे. MP Sanjay Kakade arrested for helping Gajanan Marane 

गजानन मारणे याने तळोजा Taloja तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मिरवणुकीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली आहे. यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात Crime Branch Office चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान रॅली प्रकरणी मारणे विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. काकडे यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे.

Edited by- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com