‘MPSC’ परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारीपासून परीक्षांची सुरवात होईल. 

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार १९ जानेवारीपासून परीक्षांची सुरवात होईल. 

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा १९ जानेवारी २०१९ ला होणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ ला, तर मुख्य परीक्षा १३, १४ व १५ जुलै २०१९ दरम्यान होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च २०१९ ला होणार असून महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक २८ जुलै २०१९ ला, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ११ ऑगस्ट २०१९ ला, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २५ ऑगस्ट २०१९ ला होणार आहे. 

पदनिहाय होणाऱ्या परीक्षा अशा - पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परिक्षा ३१ मार्च २०१९ ला, तर मुख्य परीक्षा ७ जुलै २०१९. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ७ एप्रिल २०१९, तर मुख्य परीक्षा १८ ऑगस्ट २०१९. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परिक्षा २८ एप्रिल २०१९, तर मुख्य परीक्षा १ सप्टेंबर २०१९, महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा १९ मे २०१९, तर मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर २०१९. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २६ मे २०१९, तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर २०१९. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून २०१९. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक ६ ऑक्‍टोबर २०१९. लिपिक टंकलेखक महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन १३ ऑक्‍टोबर २०१९. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन २० ऑक्‍टोबर २०१९ आणि कर सहायक महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन ३ नोव्हेंबर २०१९.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील वर्षीच्या परीक्षांचे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तो अद्ययावत करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकात कोणताही बदल होऊ शकतो. त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- सुनिल अवताडे (उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

Web Title: MPSC Exam Time Table Declare


संबंधित बातम्या

Saam TV Live